Multibagger Stock : टाटा ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने गेल्या 5 वर्षांत दिला जबरदस्त रिटर्न, गुंतवणूकदारांनी कमावले कोट्यवधी रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : यंदाच्या अर्थसंकल्पाआधी शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली आहे. या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी (शुक्रवारी) देखील BSE सेन्सेक्स आणि निफ्टी रेड मार्कमध्ये बंद झाल्याचे दिसून आले. मात्र शेअर बाजारातील या घसरणीच्या काळात टाटा ग्रुपच्या एका कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. या शेअर्सचे नाव Tata Elxsi असे आहे. या आठवड्यात यामध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. 41,489.19 कोटी रुपये मार्केट कॅप असलेल्या या कंपनीच्या शेअर्सने दीर्घकालावधीत गुंतवणूकदारांना उत्कृष्ट रिटर्न दिला आहे.

Tata Elxsi rises after Q3 profit grows 29%; Morgan Stanley still sees 14% downside

शेअर्समध्ये झाली जोरदार वाढ

23 जानेवारी 2009 रोजी 41.30 रुपये किंमत असलेले Tata Elxsi चे शेअर्स सध्या 6,642 रुपयांच्या पातळीवर आहेत. 2009 पासून यामध्ये 16,031 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जर एखाद्याने 14 वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये 63,000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर आता त्याला कोट्यवधी रुपये मिळाले असते. भविष्यातही यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. Multibagger Stock

Multibagger Penny Stock: ये 10 पैसे का शेयर बना रॉकेट, 1 लाख रुपये का निवेश हुआ 2 करोड़ - Best Multibagger Stock list Orient paper and industries investors return bse nse share market tuts - AajTak

गेल्या सहा महिन्यांत झाली घट

BSE वर गेल्या पाच दिवसांत या शेअर्समध्ये पाच टक्क्यांहून जास्तीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या एका महिन्यात यामध्ये 4.89 टक्क्यांनी वाढ झाली तर गेल्या सहा महिन्यांत 23.57 टक्क्यांनी घसरण झाली आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत या शेअर्समध्ये 568.85 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या शेअर्सचा गेल्या 52 आठवड्यांचा उच्चांक 10,760 रुपये तर नीच्चांक 5,709.05 रुपये आहे. शुक्रवारी सेन्सेक्स 874.16 अंकांनी किंवा 1.45 टक्क्यांनी घसरून 59,330.90 वर तर निफ्टी 287.70 अंकांनी किंवा 1.61 टक्क्यांनी घसरून 17,604.30 वर बंद झाला. Multibagger Stock

Multibagger penny stocks: 2000% bumper return on investment in 1 year, here's how

कंपनीच्या कामगिरी विषयी जाणून घ्या

Tata Alexi ही कंपनी ऑटोमोटिव्ह आणि डिझाईन क्षेत्रातील डिजिटल व्यवसाय करते. डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीने पहिल्यांदाच 10 कोटी डॉलर्सच्या कमाईचा टप्पा पार केला. डिसेंबरच्या तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर 29 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्रोकरेज फर्मने टाटा अ‍ॅलेक्‍सीच्या शेअर्सला 8,884 रुपयांची टार्गेट प्राईससहीत BUY रेटिंग कायम ठेवले आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/tata-elxsi-ltd/tataelxsi/500408/

हे पण वाचा :
Pension Scheme : केंद्र सरकार देत आहे दरमहा 20,000 रुपयांची पेन्शन, कसे ते जाणून घ्या
Gram Suraksha Yojana द्वारे दररोज 50 रुपयांची बचत करून मिळवा 35 लाख रुपये
Go First Airline ला DGCA ने ठोठावला 10 लाखांचा दंड, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
SBI च्या ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून दरमहा मिळवा खात्रीशीर उत्पन्न !!!
PM Svanidhi Yojana : स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार देत ​​आहे विना गॅरंटी कर्ज, अशा प्रकारे मिळवा फायदा