हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजार पैसे गुंतवण्याच्या लोकप्रिय माध्यमांपैकी एक मानला जातो. याद्वारे अनेक लोकं काही वर्षांतच मालामाल झाले आहेत. मात्र त्यासाठी योग्य कंपन्यांच्या शेअर्समध्ये योग्य वेळी पैसे गुंतवावे लागतील. तसेच यासाठी संयम असणेही गरजेचे आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना तो आत्मसात करणे आवश्यकच आहे. याच बरोबर चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवून आपण जितका जास्त वेळ मार्केटमध्ये राहू तितका आपला नफा वाढण्यास होईल. अशाने शेअर्सच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे आपल्या नफ्यात भरच पडेल.
तर आज आपण कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्सबाबत माहिती जाणून घेणार आहोत. कोविड-19 नंतर आलेल्या रॅलीमध्ये हे शेअर्स 1175 रुपयांवरून 1905 रुपयांपर्यंत पोहोचल्याचे पहायला मिळत आहे. हे लक्षात घ्या कि, 2008 पासून या बँकेकडून सतत आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश दिला जातो आहे. तसेच 2015 मध्ये कोटक महिंद्रा बँकेने बोनस शेअर्स देखील दिले होते. यावेळी एका शेअरचा बोनस देण्यात आला होता. Multibagger Stock
यानंतर जर एखाद्या गुंतवणूकदाराकडे कंपनीचे 100 शेअर्स असतील तर बोनस शेअर्स मिळाल्यानंतर ते दुप्पट झाले असतील. अशाप्रकारे त्यांच्या गुंतवणुकीवरील रिटर्नही दुप्पट झाला असेल. जुलै 2015 मध्ये हे बोनस शेअर्स दिले गेले होते. जर एखाद्याने 20 वर्षांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आज त्याच्या गुंतवणुकीची एकूण रक्कम 5.53 कोटी रुपये झाली असेल. Multibagger Stock
नफा कसा वाढला ???
इथे हे जाणून घ्या कि, NSE वर 25 ऑक्टोबर 2002 रोजी कोटक महिंद्रा बँकेच्या एका शेअर्सची किंमत 6.88 रुपये होती. जर एखाद्याने 20 वर्षांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्याला सुमारे 14,534 शेअर्स मिळाले असते. यानंतर बोनस शेअर्स मिळाल्यानंतर एकूण शेअर्सची संख्या 29068 झाली असती. आज कोटक महिंद्रा बँकेच्या एका शेअरची किंमत 1905 रुपये आहे. म्हणजे आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.53 कोटी रुपये झाले असते. Multibagger Stock
शेअर्सविषयी जाणून घ्या
कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात 11 टक्क्यांहून जास्तीने घसरल्याचे दिसून आले आहे. त्याच वेळी, गेली 5 वर्षांच्या कालावधीमध्ये या शेअर्सने 76 टक्के रिटर्न दिला आहे. डिसेंबर 2019 मध्ये 1724 रुपयांच्या पातळीवर असणाऱ्या या शेअर्समध्ये कोविड-19 च्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रचंड घसरण होऊन 1100 रुपयांच्या जवळ पोहोचले. मात्र मे 2020 मध्ये त्यामध्ये पुन्हा एकदा वाढू होऊन ते 1900 च्या पुढे आले आहेत. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.kotak.com/en/home.html
हे पण वाचा :
DBS Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा
गेल्या 2 वर्षांत ‘या’ Penny Stock ने गुंतवणूकदारांना मिळवून दिले लाखो रुपये
Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये पैसे गुंतवून मिळवा अनेक फायदे !!!
IDBI Bank ने लाँच केली स्पेशल FD, नवीन व्याज दर तपासा
IQOO Neo 7 5G स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह लॉन्च, किंमत अन् फीचर्स जाणून घ्या