हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : देशातील सर्वात मोठ्या आणि जुन्या उद्योगपतींमध्ये महिंद्रा ग्रुपचा देखील समावेश आहे. भारतासहीत जगातील अनेक देशांमध्ये हा ग्रुप ऑटोमोबाईल्स, ऑटो इक्विपमेंट, फायनान्शिअल सर्व्हिसेस, माहिती तंत्रज्ञान, रिअल इस्टेट यासारख्या क्षेत्रात व्यवसाय करत आहे. शेअर बाजाराच्या माहितीनुसार या ग्रुपच्या एकूण आठ कंपन्या येथे लिस्टेड आहेत. यापैकी 05 कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या एका वर्षात 100% पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. तसेच, उर्वरित तीन कंपन्यांच्या शेअर्सनी फ्लॅट किंवा निगेटिव्ह रिटर्न दिला आहे.
Mahindra & Mahindra
Mahindra च्या या प्रमुख कंपनीचे शेअर्सही रिटर्न देण्याच्या बाबतीत मागे नाही. सध्याच्या काळात, कंपनीने एकामागून एक अनेक एसयूव्ही लॉन्च करून ऑटो सेगमेंटमध्ये आपला सहभाग वाढवला आहे. XUV 300, XUV 700 आणि थार सारखी वाहने लॉन्च केल्याचा कंपनीला खूपच फायदा झाला आहे. यामुळे गेल्या वर्षभरात या कंपनीचे शेअर्स 65 टक्क्यांहून जास्तीचे वाढून 1,370 रुपयांच्या जवळ पोहोचले आहेत. Multibagger Stock
Mahindra Holidays & Resorts India
कोरोना महामारीमुळे हॉटेल, ट्रॅव्हल यासारख्या क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला. मात्र, आता महामारीचा प्रभाव कमी झाल्यामुळे तसेच कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट झाल्यानंतर, ही क्षेत्रे वेगाने सावरत आहेत. ज्याचा फायदा या क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांना होतो आहे. याच कारणामुळे महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडियाचे शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात सुमारे 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. Multibagger Stock
Mahindra & Mahindra Financial Services
या NBFC कंपनीने गेल्या एका वर्षात मल्टीबॅगर रिटर्न देण्यात यशस्वी झाली आहे. या कंपनी कडून सध्या प्रामुख्याने लहान शहरे आणि ग्रामीण बाजारपेठांमध्ये ही ऑटो लोन दिले जाते आहे. गेल्या एका वर्षात या शेअर्सची किंमत सुमारे 75 टक्क्यांनी वाढली आहे. सध्या त्याच्या एका शेअर्सची किंमत सुमारे 260 रुपये आहे. Multibagger Stock
Mahindra CIE Automotive
ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या या कंपनीने गेल्या एका वर्षात सर्वाधिक रिटर्न दिला आहे. सुमारे वर्षभरापूर्वी, या कंपनीच्या एका शेअर्सची किंमत सुमारे 200 रुपये होती, जी आता 400 रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. म्हणजेच, त्याने एका वर्षात 100% पेक्षा जास्त रिटर्न देत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. Multibagger Stock
Mahindra Lifespace Developers
रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणाऱ्या महिंद्रा ग्रुपच्या या कंपनीचे शेअर्स गेल्या एका वर्षात 25 टक्क्यांहून अधिकने वाढले आहेत. अनेक ब्रोकरेज हाऊसेस आगामी काळात या शेअर्सकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत आहेत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/mahindra–mahindra-ltd/mm/500520/
हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
EPFO आता परदेशातही देणार मोफत उपचार-पेन्शनसारख्या अनेक सुविधा, याचा लाभ कसा घ्याव ते पहा
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, कर्जावरील व्याजदरात केली वाढ