हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारामध्ये प्रचंड अस्थिरतेचे वातावरण आहे. 2022 मध्ये आतापर्यन्त बीएसईच्या सेन्सेक्समध्ये दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. निफ्टीमध्ये देखील जवळपास सारखीच स्थिती आहे. मात्र असे असले तरीही काही शेअर्स हे गुंतवणूकदारांना भरपूर नफा मिळवून देत आहेत. यशो इंडस्ट्रीजचे शेअर्स देखील गेल्या वर्षभरापासून गुंतवणूकदारांना पैसे मिळवून देत आहेत.
मात्र हे लक्षात घ्या कि, गुरुवारी यशो इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 4.65 टक्क्यांनी घसरण झाली आहे. बीएसईवर तो 1,501.21 रुपयांवर बंद झाला. कंपनीची सध्याची मार्केटकॅप 1.7 लाख कोटी रुपये आहे. या शेअर्सचा गेल्या 52 आठवड्यांचा उच्चांक 2,099 रुपये तर 52 आठवड्यांचा नीचांक 421 रुपये आहे. Multibagger Stock
यशो इंडस्ट्रीजच्या शेअर्सने पाच वर्षांत गुंतवणूकदारांना 1,388 टक्के मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. तर गेल्या एका वर्षात हे शेअर्स 242 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या एका महिन्यात या शेअर्समध्ये 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये हा शेअर 3.25 टक्क्यांनी वधारला आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.yashoindustries.com/
हे पण वाचा :
Toyota RAV4 : TOYOTA ची RAV 4 भारतात लवकरच येणार; पहा फीचर्स आणि सर्वकाही
Gold Price Today : जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे सोन्या-चांदीच्या दरात घसरण, नवीन दर तपासा
BSNL च्या प्रीपेड प्लॅनमध्ये 3 रुपयांत मिळवा 1 GB डेटासहित अनलिमिटेड कॉलिंग !!!
इशारा !!! आता मोठ्या व्यवहारांवर Income Tax Department ठेवणार लक्ष, पकडताच बजावणार नोटीस