हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : शेअर बाजारातून पैसे कमवण्यासाठी गुंतवणूकदारांना खूप संयम बाळगावा लागतो. दीर्घकालीन गुंतवणुकीवर विश्वास असणारी लोकंच सहसा शेअर बाजारातून प्रचंड नफा कमावतात. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स देखील आहेत ज्यांनी दीर्घकालीन मुदतीमध्ये भरपूर रिटर्न दिला आहे. अशा शेअर्समध्ये Marico Limited या कंपनीच्या नावाचाही समावेश आहे.
हे लक्षात घ्या कि, FMCG क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या Marico Limited ची गणना सध्या लार्ज-कॅप कंपन्यांमध्ये केली जाते. त्याची मार्केट कॅप जवळपास 67.73 हजार कोटी रुपये आहे. तसेच कंपनीकडे हेअर केअर, स्किन केअर, एडिबल ऑइल, हेल्थ फूड्स, मेल ग्रुमिंग आणि फॅब्रिक केअर सेगमेंटमध्ये पॅराशूट, निहार नॅचरल्स, हेअर अँड केअर, लिव्हॉन, सॅफोला, सेट वेट, बिअरडो, रिव्हाइव्ह इत्यादी प्रमुख ब्रँड आहेत. Multibagger Stock
NSE वर 8 ऑगस्ट रोजी Marico Limited चे शेअर्स 0.94% टक्क्यांनी वाढून 524.60 रुपयांवर बंद झाले. एका महिन्यात या शेअर्समध्ये सुमारे 3.34 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका वर्षात त्यात फक्त 0.77 टक्के वाढ झाली असली तरी गेल्या त्याने 5 वर्षात 63.96% रिटर्न दिला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या 10 वर्षात जवळपास 450 टक्क्यांनी वाढ झाली आहे. NSE वर जुलै 2001 मध्ये Marico Limited च्या शेअर्सची किंमत 2.81 रुपये होती. जी आज 524.60 रुपये इतकी झाली आहे. अशाप्रकारे, या कंपनीने गेल्या 21 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 18,569.04 टक्के मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
जर एखाद्याने महिन्याभरापूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 1,03,400 रुपये झाले असेल. जर एखाद्याने वर्षभरापूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याला 1,00,770 रुपये मिळले असतील. Multibagger Stock
त्याचप्रमाणे, जर एखाद्याने 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याला 1,63,960 रुपये मिळाले असतील. 10 वर्षांपूर्वी जर एखाद्याने 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 5,50,000 रुपये मिळाले असते. तसेच, जर एखाद्याने जुलै 2001 मध्येच 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याची गुंतवणूक 18,569.04% ने वाढून आज 1,86,69,040 रुपये झाली असती. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला द्या : https://marico.com/
हे पण वाचा :
Yes Bank ने FD वरील व्याज दरात केली वाढ, नवे दर तपासा
Honda CB300F : Honda ने लॉन्च केली दमदार बाईक; पहा फीचर्स आणि किंमत
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजच्या किंमती पहा
देवीच्या पाया पडला अन् मग दागिने चोरून पसार झाला, CCTV फुटेज आले समोर