Thursday, October 6, 2022

Buy now

देवीच्या पाया पडला अन् मग दागिने चोरून पसार झाला, CCTV फुटेज आले समोर

मध्यप्रदेश : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या (robbery) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे चोर घरे, दुकाने तर लुटत आहेत आता तर त्यांनी आपला मोर्चा मंदिरांकडे वळवला आहे. हे चोर मंदिरातील दागिने दानपेट्या सर्रासपणे चोरत (robbery) आहेत. अशीच चोरीची (robbery) घटना समोर आली आहे. यामध्ये चोर चोरी करण्यापूर्वी आधी देवाच्या पाया पडला. त्याने आपल्या कृत्याची माफी मागीतली. अन् मग दानपेटी घेऊन पसार झाला. ही संपूर्ण घटना मंदिरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या CCTV फुटेजच्या आधारे पोलीस त्या चोराचा शोध घेत आहेत.

कुठे घडली हि घटना ?
ही घटना मध्यप्रदेशमधील जबलपूर या ठिकाणी घडली आहे. या चोरानं (robbery) आपल्या तोंडावर रुमाल बांधला आहे. जेणेकरून त्याला कोणी ओळखू नये. त्यानंतर तो देवीच्या पाया पडला. त्यानंतर मंदिरातील 3 दानपेट्या घेऊन तो पसार झाला. हा व्हिडीओ पाहून पोलीस देखील चक्रावले आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पोलीस या व्हिडिओच्या आधारे आरोपी चोरट्याचा शोध घेत आहेत.

या चोरानं (robbery) 3 दानपेट्या, देवीचे दागिने, मंदिरातील दोन घंट्या आणि इतर मौल्यवान सामान चोरले आहे. पोलीस या चोरटयाचा कसून शोध घेत आहेत. CCTV फुटेजच्या आधारावर त्या चोराला लवकरच पकडण्यात येईल असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?