‘या’ Multibagger Stock ने गेल्या 4 वर्षात गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस

Multibagger Stock
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्या भारतीय शेअर बाजारात चढ-उतार सुरू आहे. मात्र इतर जागतिक बाजारांच्या तुलनेत या वर्षी भारतीय शेअर बाजार मजबूत स्थितीत राहिला आहे. तसेच या काळात शेअर बाजारात असेही अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना मोठा नफा कमावून दिला आहे. या लिसयंमध्ये सनमीत इन्फ्रा या कंपनीच्या शेअर्सचे नाव देखील सामील आहे. 4 वर्षांपूर्वी पेनी स्टॉक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शेअर्सने या काळात गुंतवणूकदारांना 5,365 टक्के रिटर्न दिला आहे.

Sanmit Infra Ltd board approves stock split | EquityBulls

एका मीडिया रिपोर्ट्स नुसार, अलीकडेच सनमीत इन्फ्राने आपल्या शेअरहोल्डर्सना स्टॉक स्प्लिट गिफ्ट केले आहे. या अंतर्गत, 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या एका शेअरच्या बदल्यात, गुंतवणूकदारांना 1 रुपये फेस व्हॅल्यू असलेले 10 शेअर्स देण्यात आले आहेत. 31 ऑक्टोबर 2022 रोजी हा मल्टीबॅगर स्टॉक एक्स-स्प्लिट झाला. 17 नोव्हेंबर 2022 रोजी, स्टॉकने 85.70 रुपयांच्या आपल्या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला. Multibagger Stock

Multibagger penny stocks: 2000% bumper return on investment in 1 year, here's how

दीर्घ कालावधीमध्ये दिला मल्टीबॅगर रिटर्न

आज मंगळवारीही सनमीत इन्फ्राचे शेअर्स किंचित वाढीसह NSE वर 71.60 रुपयांवर ट्रेड करत आहे. गेल्या 1 महिन्यात यामध्ये सुमारे 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत 75 टक्क्यांनी झेप घेतली आहे, त्यामुळे 2022 मध्ये या स्टॉकने गुंतवणूकदारांना 139.38 टक्के रिटर्न दिला आहे. एका वर्षात Sanmeet Infra ने गुंतवणूकदारांना 214% नफा दिला आहे. तसेच 5 वर्षात 5,365 टक्के नफा दिला आहे. Multibagger Stock

Dividend up to ₹10 lakh from shares exempt | Mint

गुंतवणूकदारांना केले मालामाल

4 वर्षांपूर्वी 21 डिसेंबर 2018 रोजी सनमीत इन्फ्राच्या शेअर्सची किंमत 1.31 रुपये होती. जी आता 85.70 रुपयांपर्यंत वाढली आहे. जर एखाद्याने चार वर्षांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज 65 लाख रुपये मिळाले असते. त्याचप्रमाणे एखाद्याने यामध्ये वर्षभरापूर्वी गुंतवणूक केली असती तर आज त्याची गुंतवणूक तिपटीने वाढून 314,172 रुपये झाली असती. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/sanmit-infra-limited/saninfra/532435

हे पण वाचा :
Budget 5G Smartphones : 5G फोनवर स्विच करताय !!! जरा थांबा… 30,000 रुपयांच्या रेंजमधील ‘हे’ उत्कृष्ट स्मार्टफोन्स पहा
फक्त 999 रुपयांमध्ये घरी आणा Samsung Galaxy M33 5G, ‘या’ ऑफर्सविषयी जाणून घ्या
आता घरबसल्या मिळणार Kisan Credit Card रिन्यूअल करण्याची सुविधा, त्यासाठीची पद्धत जाणून घ्या
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये घसरण, आजचे नवीन दर पहा
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 159 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा