हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : रजनीश वेलनेस लिमिटेडच्या शेअर्सने गेल्या वर्षभरात इतका मोठा रिटर्न दिला आहे की गुंतवणूकदार मालामाल झाले. त्याची किंमत साडेपाच रुपयांवरून आता 185 रुपयांवर पोहोचली आहे. अशा प्रकारे ते 3200 टक्के मजबूत रिटर्न देत आहे.
पेनी स्टॉक हे धोकादायक असतात कारण त्यामध्ये मूळ भांडवल गमावण्याचा धोकाही असतो, असे नेहमीच सांगितले जाते. मात्र काही पेनी स्टॉक्सच्या किंमती नंतर वाढतात. मात्र अशा शेअर्सची माहिती मिळणे जरा अवघड आहे. जर कोणत्याही कंपनीचे फन्डामेन्टल्स चांगले असतील आणि कंपनीचा व्यवसाय भविष्यात वाढेल असा असेल तर अशा कंपन्यांच्या शेअर्सद्वारेही चांगला नफा मिळतो. Multibagger Stock
एका मीडिया रिपोर्टनुसार, BSE वर 203 रुपयांचा उच्चांक बनवल्यानंतर हा शेअर कंसोलिडेशनच्या टप्प्यात आहे. गेल्या महिन्याभरातच हा शेअर्स सुमारे 2 टक्क्यांनी खाली आला आहे. मात्र जर आपण या वर्षाकडे बघितले तर हा शेअर्स 20.45 रुपयांवरून 185 रुपयांपर्यंत वाढला आहे. त्याने जवळपास 800 टक्के रिटर्न दिला आहे. तसेच गेल्या 6 महिन्यांत हा शेअर्स 46 रुपयांवरून 185 रुपयांवर गेला आहे. यासोबतच गेल्या वर्षीच्या जूनपासून आतापर्यंत या शेअर्सने 3200 टक्के रिटर्न दिला आहे. Multibagger Stock
कोणत्या शेअर्सने किती रिटर्न दिला आहे, हे शेअर्सच्या किंमतीची हिस्ट्री पाहून कळून येते. या शेअर्सच्या हिस्ट्रीनुसार, जर एखाद्याने महिन्याभरापूर्वी त्यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचे 2,000 रुपयांचे नुकसान झाले असते. त्याचप्रमाणे, जर एखाद्याने या वर्षाच्या सुरुवातीलाच 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आतापर्यंत त्याला 9 लाख रुपये मिळाले असतील. त्याचप्रमाणे, जर एखाद्याने 6 महिन्यांपूर्वी 1 वर्षापूर्वी त्यात 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याच्या खात्यात 33 लाख रुपये असतील.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://rajnishwellness.com/
हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या सहा महिन्यांत ‘या’ शेअर्समध्ये झाली 645 टक्क्यांची जोरदार वाढ !!!
Multibagger stock : अवघ्या काही महिन्यांत ‘या’ 5 पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना दिला 2700% रिटर्न !!!
Multibagger Stock : एका महिन्यात ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 158.59% रिटर्न !!!