शेवटच्या 5 मिनिटातच मतदान मारणार, पण… ; बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादीतील वरिष्ठांनी आपल्या आमदारांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, प्रहार क्रांती संघटनेनेचे अध्यक्ष व राज्यमंत्री बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच थेट इशारा दिला आहे. केंद्र सरकार कुचकामी ठरत असेल तर राज्य सरकारने एका हेक्टरला 4 हजार रुपयांची मदत धान व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना द्यावी, हे झाले नाही तर राज्यसभेचे मतदान शेवटच्या 5 मिनिटांवर मारणार, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

मंत्री बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला. तसेच त्यांच्याकडे एक मागणीही केली. ती जर त्यांनी मान्य केली तर त्याच्या पक्षाचे असलेले दोन आमदार शिवसेनेस मतदान करतील, अशी अटही घातली. यावेळी बच्चू कडू म्हणाले की, राज्यभरात हरभरा उत्पादकांची संख्या सुमारे 1 लाख इतकी आहे. तर धान उत्पादकांची संख्या 4 ते 5 लाख इतकी आहे. शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना माल तसाच पडून आहे. तो खरेदी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यावी, अशी पहिली मागणी कडू यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी जे नकार दिल्यास केंद्र सरकार कुचकामी ठरत असेल तर 1 हेक्टरला 5 हजार रुपयांची मदत धान व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनाराज्य सरकारकडून देण्यात यावी. हे झाले नाही तर राज्यसभेचे मतदान शेवटच्या पाच मिनिटांवर मारणार आहोत, असा इशारा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

Leave a Comment