हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी 2022 हे वर्ष आतापर्यंत तरी चांगले ठरलेले नाही. BSE सेन्सेक्स आणि निफ्टी 50 इंडेक्स मध्ये सध्या जवळपास 10 टक्क्यांनी घसरण झाली आहे. निफ्टी 500 तर तब्ब्ल 12 टक्क्यांनी घसरला आहे. हे लक्षात घ्या कि, जागतिक घटकांमुळे भारतीय शेअर बाजार खाली आला आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जगभरात महागाई वाढली आहे. याच्या परिणामी जागतिक मंदीचे वातावरण तयार झाले आहे. या मंदीच्या भीतीने अनेक मोठे गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून घेत आहेत. मात्र या मंदीच्या काळातही असे काही शेअर्स आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा मिळवून देत आहेत.
GKP Printing & Packing चे शेअर्स देखील त्यापैकीच एक आहे. गेल्या 3 वर्षांपासून या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे. गेल्या एका वर्षातबाबत बोलायचे झाल्यास या शेअर्सने 640 रुपयांचा रिटर्न दिला आहे. शुक्रवार, 24 जून रोजी, GKP Printing & Packing च्या शेअर्स मध्ये वाढ झाली. आज हे शेअर्स 1.45 टक्क्यांच्या वाढीने 185.50 रुपयांवर बंद झाले. त्याचा गेल्या 52 आठवड्यांचा उच्चांक 193.95 रुपये आहे तर 52 आठवड्यांचा नीचांक 22.75 रुपये आहे.Multibagger Stocks
GKP Printing & Packing ची एक वर्षापूर्वी किंमत 25 रुपये होती. गेल्या एका वर्षात तर या शेअर्समध्ये 640 टक्क्यांनी वाढ झाली. आज तो 185.50 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे, गेल्या सहा महिन्यांत या समभागाने गुंतवणूकदारांना 44.53 टक्के नफा दिला असून तो 128 रुपयांवरून 185.50 रुपयांवर गेला आहे. 2022 मध्ये, हा शेअर्स 28% वाढला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला त्याची किंमत 144.50 रुपये होती. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये तर हा शेअर 6.17 टक्क्यांनी वधारला आहे. Multibagger Stocks
या शेअर्समध्ये एका वर्षापूर्वी 1 लाख रुपये गुंतवलेल्या गुंतवणूकदाराला एका महिन्यात 1,28,596 रुपये मिळाले असतील. त्याचप्रमाणे ज्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी यामध्ये एक लाख रुपये गुंतवले होते, त्याला आता 1,44,921 रुपये मिळाले असतील. जर एखाद्याने वर्षभरापूर्वी या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याला 742,000 रुपये मिळले असतील. Multibagger Stocks
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.gkpl.in/
हे पण वाचा :
लहान व्यावसायिकांसाठी OYO ची खास ऑफर, हॉटेल बुकिंगवर मिळणार 60% सूट !!!
Canara Bank ने सुरु केली स्पेशल FD, असा असेल व्याज दर !!!
PAN-Aadhar Linking साठी आता फक्त 6 दिवसच बाकी, अशा प्रकारे पूर्ण करा प्रक्रिया