Multibagger Stocks : घसरत्या बाजारातही ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला लाखोंचा नफा !!!

Multibagger Stock
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : या आठवड्यात शेअर बाजाराने वेगळेच वळण घेतले आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून शेअर बाजारात अस्थिरतेची हीच स्थिती दिसून येते आहे. यामुळे ज्यांना झटपट नफा कमवायचा आहे त्यांना आपले पैसे नक्की कुठे गुंतवावे हे समजत नाही. मात्र, या अस्थिरतेच्या काळात असेही काही शेअर्स आहेत जे अजूनही गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न मिळवून देत आहेत.

Rama Steel Tubes Ltd announces Capacity Expansion of additional 30,000 MT  at Khopoli Plant, Maharashtra | EquityBulls

रामा स्टील्स ट्यूब्सचे शेअर्सही याच कॅटेगिरीमध्ये मोडतात. या शेअर्सने गेल्या 2 वर्षांत गुंतवणूकदारांना 1175 टक्के रिटर्न दिला आहे. सध्या बाजार आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांकी खाली गेला आहे. मात्र असे असूनही ते आपल्या गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न देत आहे.

Fortune India: Business News, Strategy, Finance and Corporate Insight

गेल्या एका महिन्यात या शेअर्समध्ये 343 रुपयांवरून 378 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. सध्या बहुतांश शेअर्समध्ये घसरण झाली आहे मात्र असे असूनही हे शेअर्स 10 टक्क्यांहून अधिकने वाढले आहे. तसेच गेल्या 6 महिन्यांपूर्वी या शेअर्सची किंमत 228 रुपये होती, तेथून या शेअर्समध्ये 65 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 1 वर्षात, हे शेअर्स 94 रुपयांवरून 385 रुपयांपर्यंत वाढले आहेत, या दरम्यान त्यामध्ये 300 टक्क्यांहून अधिकने वाढ झाली आहे. Multibagger Stocks

Multibagger Penny Stock simplex papers ltd made 50 thousand to 20 lac |  Multibagger Penny Stock : 50 हजार लगाकर 20 लाख कमाए, घर बैठे-बैठे आप भी  करें ऐसा | Hindi News, बिजनेस

जर एखाद्याने 2 वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आज त्याला 12 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली असेल. त्याचप्रमाणे, जर कोणी 1 वर्षापूर्वी या मध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज ती रक्कम 4 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली असेल. जर एखाद्याने 6 महिन्यांपूर्वी एक लाख रुपये गुंतवले असेल तर त्याची रक्कम 1.65 लाख रुपये झाली असेल. त्याचबरोबर 1 महिन्यापूर्वी, या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवणाऱ्याला 1.10 लाख रुपये मिळाले असतील. Multibagger Stocks

इथे हे लक्षात घ्या कि, रामा स्टील पाईप्सचे शेअर्स अजूनही नफ्यात आहेत. NSE वर सुमारे 2 टक्क्यांच्या वाढीसह हा शेअर 383 रुपयांवर ट्रेड करत आहे. Multibagger Stocks

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://ramasteel.com/

हे पण वाचा :

Gold Price Today : सोन्याच्या दरात घसरण तर चांदी किंचित वाढली, आजचे नवीन दर पहा

Vehicle Parking Rule :’आता रस्त्यावर पार्क केलेल्या कारचा फोटो पाठवणाऱ्याला मिळणार 500 रुपयांचे बक्षीस’, नितीन गडकरी काय म्हणाले ते पहा

EPFO : नॉमिनेशन नसेल तर क्लेम दाखल करण्यासाठी काय करावे लागेल ते समजून घ्या

Multibagger Stock : दीर्घकालावधीत ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!

Multibagger Stocks : गेल्या 21 दिवसात ‘या’ दोन शेअर्सने दिला 100% नफा !!!