हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे सध्या भारतीय शेअर बाजारात जोरदार घसरण झाली आहे. यावेळी अनेक शेअर्स आपल्या नीचांकी पातळीवर ट्रेड करत आहेत. मात्र या घसरणीमध्ये देखील काही असे शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना मजबूत रिटर्न दिला आहे. Astral Limited चे शेअर्सही त्याच श्रेणीत येतात. ही एक प्लॅस्टिक पाईप बनवणारी कंपनी आहे.
गेल्या 1 वर्षात Astral ने चांगली कामगिरी केली नसली तरी दीर्घ कालीन मुदतीमध्ये त्यांनी गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. हे लक्षात घ्या कि, गेल्या 10 वर्षांत Astral च्या शेअर्सची किंमत 25.75 रुपयांवरून 1,685 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत NSE वर या शेअर्सच्या किंमतीत 6,000 टक्क्यांहून अधिकने वाढ झाली. Multibagger Stocks
बुधवारी बीएसईवर Astral Limited चा शेअर 1.85 टक्क्यांनी घसरून 1654.95 रुपयांवर बंद झाला. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्यामुळे त्याच्या किंमतीत सुमारे 30 टक्क्यांनी घट झाली आहे. सध्या तो 1,584.00 च्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आहे. मात्र दीर्घकालीन दृष्टीकोनातून पाहिल्यास हा शेअर गेल्या 10 वर्षांत जोरदार वाढला आहे. Multibagger Stocks
5 वर्षात 290 टक्के रिटर्न
गेल्या 1 महिन्यात, या शेअर्सने 1,712 रुपयांच्या तुलनेत 5 टक्क्यांहून अधिकने घसरण नोंदवली आहे. गेल्या 6 महिन्यांत त्यामध्ये सुमारे 28 टक्के, तर गेल्या वर्षभरात सुमारे 16 टक्क्यांनी घट झाली आहे. या वर्षी स्टॉक 2,332 रुपयांवरून 1689.3 वर घसरला आहे. यावेळी त्यामध्ये सुमारे 30 टक्क्यांनी घट झाली आहे. मागील 5 वर्षांचा विचार केला तर या शेअर्सने सुमारे 290 टक्के रिटर्न दिला आहे. Multibagger Stocks
10 वर्षात 6,000 टक्के रिटर्न
10 वर्षांपूर्वी याच्या एका शेअर्सची किंमत फक्त 25.75 रुपये होती. सध्या ती 1,689 रुपयांच्या पुढे आहे. गेल्या 10 वर्षांत या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 6,000 टक्क्यांहून अधिकचा रिटर्न दिला आहे. जर एखाद्याने 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आज त्याला 63 लाख रुपये मिळाले असतील. मात्र, हे लक्षात घ्या कि, गेल्या 1 वर्षापासून या शेअर्स मध्ये सातत्याने घसरण होत आहे. Multibagger Stocks
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.astralpipes.com/
हे पण वाचा :
EPF खात्यातील रजिस्टर्ड मोबाईल नंबर अशा प्रकारे घर बसल्या बदला !!!
Gold investment : अशा प्रकारे स्वस्तात खरेदी करता येईल सोने !!!
Share Market : ‘या’ Paints कंपन्यांच्या शेअर्सनी 3 वर्षात पैसे केले दुप्पट !!!
किसान विकास पत्रामध्ये TAX कसा आकारला जातो ??? अशा प्रकारे समजून घ्या
ICICI Bank कडून 6 दिवसात दुसऱ्यांदा FD वरील व्याजदरात वाढ, सुधारित दर जाणून घ्या