हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : शेअर बाजारातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून अनेक गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. मात्र त्यामध्ये जोखीमही तितकीच असते. मात्र शेअर बाजाराद्वारे पैसे कमावण्यासाठी संयम बाळगणे देखील महत्वाचे ठरते. त्याचबरोबर योग्य शेअर्समध्ये योग्य वेळी गुंतवणूक करणे खूप महत्वाचे असते. हे जाणून घ्या कि, शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना दीर्घ आणि अल्प मुदतीमध्ये भरपूर पैसे मिळवून दिले आहेत.
प्रत्येक गुंतवणूकदार मोठा रिटर्न देणाऱ्या मल्टीबॅगर स्टॉक्समध्ये गुंतवणूक करायचा प्रयत्न करत असतो. मल्टीबॅगर स्टॉक्स असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना अवघ्या काही हजारांच्या गुंतवणुकीने लाखो रुपये मिळवून दिले आहेत. बाजारात घसरण होऊनही या शेअर्समध्ये चांगली वाढ झाल्याचे दिसून आले आहे. चला तर मग अशा शेअर्सविषयी जाणून घेउयात…
13 ऑक्टोबर रोजी रामा स्टील ट्यूब्सच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांनी वाढ होऊन ते 116.05 रुपयांवर आले आहेत. जून 2020 रोजी हे शेअर्स 30.60 रुपयांच्या जवळ होते. यानंतर त्यामध्ये जोरदार वाढ होऊन जून 2022 मध्ये ते 380 रुपयांच्या पातळीवर आले. मात्र, या झालेल्या घसरणीने आता शेअर्सची किंमत 120 रुपये झाली आहे. Multibagger Stocks
चांगल्या दर्जाचे कापूस तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये अॅक्सिटा कॉटनचे नाव सामील आहे. जानेवारी 2019 मध्ये या 21 रुपये किंमत असलेले हे शेअर्स आता 370 रुपयांवर आहेत. या कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना 1700% रिटर्न मिळाला आहे. Multibagger Stocks
ऑटो आणि ई-रिक्षा बनवणाऱ्या अतुल ऑटो या कंपनीच्या शेअर्सने दीर्घ कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न मिळवून दिला आहे. गेल्या 20 वर्षांच्या कालावधीमध्ये फक्त 50,000 रुपयांची गुंतवणूक करून गुंतवणूकदार करोडपती बनले आहेत. डिसेंबर 2002 मध्ये 1.13 रुपये किंमत असलेले हे शेअर्स गेल्या दोन दशकात 229 पटीने वाढून 259.10 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. Multibagger Stocks
Garden Reach Shipbuilding & Engineer च्या शेअर्सने देखील गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. 15 जुलैला हे शेअर्स 234 रुपयांच्या पातळीवर होते. यानंतर 14 ऑक्टोबरपर्यंत हे शेअर्स 465 रुपयांवर आले आहेत. अशा प्रकारे गेल्या तीन महिन्यांत या कंपनीच्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. Multibagger Stocks
या वर्षी एप्रिलच्या मध्यापासून मेटल कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली आहे. मात्र जूनच्या शेवटी मेटल कंपन्यांच्या शेअर्सने सपोर्ट तयार केला आहे. त्यानंतर आता यामध्ये पुन्हा एकदा मजबूत वाढीचा कल दिसून येत आहे. Multibagger Stocks
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://grse.in/
हे पण वाचा :
Train Cancelled : रेल्वेकडून 184 गाड्या रद्द, अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत घसरण तर चांदीच्या दरात वाढ
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 23 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा फ्री कॉलिंग अन् डेटा !!!
WhatsApp वर लवकरच मिळणार ‘हे’ 5 जबरदस्त फिचर्स, त्याविषयी जाणून घ्या
Dhanteras 2022 : धनत्रयोदशीला सोने खरेदी करताय? पहा काय आहे यासाठीचा शुभ मुहूर्त