हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : गेल्या 2 आठवड्यांपासून शेअर बाजार तेजीत आहे. मात्र 2022 मध्ये शेअर बाजाराने गुंतवणूकदारांची चांगलीच निराशा केली आहे. मात्र असे असूनही काही शेअर्सनी सातत्याने चांगला रिटर्न दिला आहे. महिन्याबद्दल बोलायचे झाले तर काही शेअर्सनी त्यांचे पैसे दुप्पट केले आहेत. आठवड्याबद्दल बोलायचे झाले तर काही शेअर्स 40-60 टक्क्यांनी वाढले आहेत.
आज या बातमीमध्ये आपण गेल्या आठवड्यात (25-29 जुलै) कोणकोणत्या शेअर्समध्ये (Multibagger Stocks) सर्वाधिक वाढ झाली याची माहिती जाणून घेणार आहोत. या शेअर्समध्ये व्हीएसएफ प्रोजेक्ट्स लि., सैलानी टूर्स एन ट्रॅव्हल्स लिमिटेड, ग्रेडियंट इन्फोटेनमेंट लि., जयंत इन्फ्राटेक लि., आणि प्रेशर सेन्सिटिव्ह सिस्टम्स (इंडिया) लि. या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे.
VSF Projects Ltd.
शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 44.4 रुपयांवर बंद झाले. गेल्या आठवड्यात ते 29.95 रुपयांवर बंद झाले होते. यावेळी त्याने 48.25 टक्के रिटर्न दिला. या शेअर्स ची बीएसईच्या X ग्रुपमध्ये ट्रेडिंग केले जाते. साधारणपणे याच्या 6 हजार शेअर्सची देवाणघेवाण होते, मात्र शुक्रवारी संपलेल्या आठवड्यात 21 हजारांहून जास्त शेअर्स आले आहेत. Multibagger Stocks
Pressure Sensitive Systems (India) Ltd.
सलग चार दिवस (25 ते 29 जुलै) या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटने बंद झाले. गेल्या आठवड्यात (29 जुलै) हे शेअर्स 28.68 वर बंद झाले. यावेळी त्याने 46.63 टक्के रिटर्न दिला आहे. गेल्या आठवड्यात जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल त्याला आता 46 हजार रुपयांचा नफा मिळाला असेल. Multibagger Stocks
Sailani Tours N Travels Ltd.
गेल्या आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने 59.18 टक्के इतका चांगला रिटर्न दिला आहे. बीएससीच्या ग्रुप M वर ट्रेड केला जाणारा हा शेअर शुक्रवारी (29 जुलै) 37.79 रुपयांवर बंद झाला. तर गेल्या आठवड्यात हाच शेअर 23.74 रुपयांवर बंद झाला होता. गेल्या आठवड्यात जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल त्याला आता सुमारे 1 लाख 60 हजार रुपयांचा नफा मिळाला असेल. Multibagger Stocks
Jayant Infratech Ltd.
गेल्या आठवड्यात या शेअर्सने 46.61 टक्के रिटर्न दिला आहे. शुक्रवारी हे शेअर्स 164.2 रुपयांवर बंद झाले. या कंपनीचे शेअर्स बीएससीच्या ग्रुप M वर ट्रेड केले जातात.गेल्या आठवड्यात जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल त्याला आता सुमारे 1 लाख 46 हजार रुपयांचा नफा मिळाला असेल. Multibagger Stocks
Gradiente Infotainment Ltd.
ग्रेडियंट इन्फोटेनमेंटने या आठवड्यात 39.24 टक्के रिटर्न दिला आहे. बीएसईच्या X श्रेणीचा हा शेअर या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी (29 जुलै रोजी) 4.01 रुपयांवर बंद झाला आहे. Multibagger Stocks
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.nse.com
हे पण वाचा :
Bank Holidays : बँकांना ऑगस्टमध्ये असणार 17 दिवस सुट्टी, सुट्ट्यांची लिस्ट तपासा
बँकेच्या ATM द्वारे घरबसल्या दरमहा कमवा हजारो रुपये !!!
HDFC च्या ग्राहकांना धक्का !!! कंपनीचे होम लोन महागले
Changes from 1 August : ऑगस्ट महिन्यात होणार ‘हे’ 5 महत्त्वाचे आर्थिक बदल !!!
ITR भरण्याची मुदत वाढणार का?? आयकर विभागाने स्पष्ट केली भूमिका