हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stocks : गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात अनिश्तीततेचे वातावरण आहे. गेले काही बाजारात चढ-उतार पहायला मिळत आहेत. बहुतेक सेक्टर्स आणि शेअर्समध्ये घसरण होते आहे. मात्र, या पडझडीतही दोन असे शेअर्स आहेत ज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांबाबत बोलायचे झाल्यास या दोन्ही शेअर्समध्ये अप्पर सर्किट दिसून आले आहे. तसेच या दोन्ही कंपन्यांची मार्केटकॅप मध्ये दुप्पट वाढ झाली आहे.
तर आज आपण कोहिनूर फूड्स आणि हिंदुस्थान मोटर्सच्या मल्टीबॅगर स्टॉकबाबत माहिती जाणून घेणार आहोत. हे लक्षात घ्या कि, 24 मे 2022 रोजी कोहिनूर फूड्सच्या शेअर्सची किंमत 10.77 रुपये होती. गेल्या तीन आठवड्यात यामध्ये 137 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे कोहिनूर फूड्सचे शेअर्स सलग सत्तेचाळीसाव्या दिवशी अप्पर सर्किटमध्ये बंद झाले आहेत. Multibagger Stocks
याबरोबरच हिंदुस्तान मोटर्सच्या शेअर्समध्येही आज अप्पर सर्किटमध्ये दिसून आले. या शेअर्समध्ये 4.93 टक्क्यांच्या वाढीसह 25.55 रुपयांवर बंद झाले. गेल्या एका महिन्यात या शेअर्समध्ये 132 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्समधील या वाढीबाबत कंपनीने म्हंटले की, शेअर्सच्या किंमतीतील हा चढ-उतार किंवा त्याच्या शेअर्सच्या व्हॉल्यूममध्ये झालेली उडी ही पूर्णपणे बाजारातील भावनांवर आधारित आहे. या किंमती वाढण्याशी कंपनीचा काहीही संबंध नाही.
इथे हे लक्षात घेण्यासारखे आहे कि, हिंदुस्तान मोटर्सच्या प्रमोटर्सनी गेल्या 6 महिन्यांत कंपनीचे कोणतेही शेअर्स विकले नाहीत किंवा विकत घेतले नाहीत. Multibagger Stocks
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : http://www.hindmotor.com/
हे पण वाचा :
Trent Boult ने मोडला फलंदाजीतला ‘हा’ विश्वविक्रम !!!
axis bank नेही आपल्या FD-बचत खात्यावरील व्याजदरात केली वाढ !!! नवीन दर तपासा
Business idea : स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून मिळवा भरपूर नफा !!!
FD Rate : SBI ग्राहकांसाठी चांगली बातमी, बँकेने FD वरील व्याजदर वाढवले
Bank FD : ‘या’ बँकाकडून टॅक्स सेव्हिंग FD वर मिळत आहे सर्वाधिक व्याज !!!