हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PF Account : जर पीएफ खातेधारक असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. जेव्हा एखाद्या खाजगी कंपनीतील कर्मचारी नोकरी बदलतो तेव्हा त्याच्या मालकाकडून नवीन ईपीएफ खाते उघडले जाते. मात्र, ते उघडताना जुना UAN क्रमांकच वापरला जातो. जर आपल्याकडेही दोन किंवा त्यापेक्षा जास्त खाती असतील तर ही सर्व पीएफ खाती विलीन करावी लागतील. आता पीएफ खाती विलीन करण्याची प्रक्रिया घरबसल्या ऑनलाइन आरामात पूर्ण करता येईल. आपली सर्व पीएफ खाती विलीन केल्यामुळे त्यावर जास्त व्याजही मिळेल.
जर आपण नवीन कंपनीत नोकरी जॉईन करताना आपला जुना UAN नंबर दिला तर आपले जुने खाते नवीन खात्याशी लिंक करता येणार नाही. म्हणजेच आपल्या जुन्या खात्यातील पैसे नवीन खात्यामध्ये जमा होणार नाहीत. यामुळे आपले पैसे नवीन खात्यामध्ये जमा करण्यासाठी आपले पीएफ खाते (PF Account) विलीन करावे लागेल. यासाठी ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे Services मध्ये जाऊन स्टेप बाय स्टेप काही माहिती द्यावी लागेल. चला तर मग पीएफ खाते विलीन करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊयात…
अशा प्रकारे आपले PF Account विलीन करा
यासाठी सर्वात आधी EPFO च्या अधिकृत वेबसाइट https://www.epfindia.gov.in/site_en/ वर साइन इन करा.
यानंतर मेन पेजवर जाऊन My Account वर क्लिक करा.
My Account वरील अकाउंट डिटेल्स अंतर्गत Merge Account निवडा.
Merge Account पेज वर आपल्याला ज्या नवीन खात्यामध्ये विलीन करू इच्छित खात्यांचे डिटेल्स भरा.
संपूर्ण तपशील भरल्यानंतर, आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पडताळणीसाठी एक OTP येईल.
हा OTP नंबर टाकताच आपली जुनी PF खाती दिसू लागतील.
यानंतर EPFO खात्याशी एकापेक्षा जास्त बँक खाती जोडलेली असल्यास आपले नवीन ऍक्टिव्ह बँक अकाउंट म्हणून कोणते खाते वापरायचे आहे ते निवडा.
ही माहिती भरल्यानंतर सेव्ह करा आणि नंतर बंद करा.
यानंतर आपले नवीन विलीन केलेले EPFO खाते तयार केले जाईल आणि पडताळणीनंतर ते ऍक्टिव्ह केले जाईल. PF Account
हे पण वाचा :
Flipkart च्या बिग सेव्हिंग डेज सेलमधून सोनीचा 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करण्याची संधी
SBI ने प्राइम लेंडिंग रेट अन् बेस रेटमध्ये केली 70 bps ने वाढ, ‘या’ ग्राहकांना बसणार फटका
BSNL ने आणला जबरदस्त प्लॅन, 5 महिन्यांसाठी सर्व काही मोफत
फक्त विना तिकीट प्रवासच नाही तर ‘या’ चुकांसाठीही Railway कडून दिली जाते शिक्षा
देशभरात प्रवास करताना ‘या’ लोकांना द्यावा लागत नाही Toll Tax, पहा संपूर्ण लिस्ट