Mumbai Airport : मुंबई विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी; 1 दशलक्ष डॉलर्सची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपणा सर्वांनाचा मुंबईचा 26/11 चा बॉम्बस्फोट माहितीये. यात दहशतवाद्यानी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात देशाने अनेकांना गमावले. आता तुम्हाला वाटत असेल की, हे आम्ही आता का बोलतोय तर मुंबई पोलिसांचे टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांना मुंबई विमनातळ (Mumbai Airport) बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे 48 तासात बॉम्ब फोडला जाईल असे धमकी देणार्याने ई मेल मध्ये लिहिले आहे

ई -मेलद्वारे दिली धमकी- Mumbai Airport

मुंबई पोलिसांना गुरुवारी म्हणजेच काल 11 वाजता ई – मेलद्वारे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (Mumbai Airport) लिमिटेडच्या फीडबॅक इनबॉक्स मध्ये हा ई-मेल पाठवला होता. यात त्याने सांगितले की, “मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 वर 48 तासांच्या आत बॉम्ब बॉम्बस्फोट करू जर आम्हाला बिटकॉइन मध्ये एक दशलक्ष डॉलर्स पाठवले तर हा बॉम्बस्फोट थांबवला जाऊ शकतो. या मेलमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी आपला तपास सुरु केला आहे.

ई – मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरु-

मुंबई विमानतळाबाबत मिळालेल्या धमकीचा शोध घेत ज्या आयपी ऍड्रेसचा वापर करून हा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला होता. त्याचा शोध घेण्यात आला आहे. त्यामुळे हा धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख लवकरच पटली जाईल. त्यासाठी पोलिसांची तपास यंत्रणा काम करत आहे.