मुंबईकरांनो, डबल डेकर AC बसेसचा घ्या मनसोक्त आनंद; मिळतात ‘या’ खास सुविधा

Mumbai Double Decker Bus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई मध्ये नवीन जाणाऱ्या प्रवाश्याला कुतूहल आहे ते बेस्टच्या डबलडेकर बसेसच …. डबलडेकर बसेस मुळे मुंबईची नवी ओळख निर्माण झालेली आहे. पण बेस्टच्या ताफ्यातील डबलडेकर बसेसची वयोमर्यादा संपल्याने आता त्याजागी नवीन इलेक्ट्रिकल डबल डेकर बसेस बेस्टच्या ताफ्यात आल्या आहेत. सुरुवातीला मुंबई शहरात डबलडेकर बसेस प्रवाशांच्या सेवेत रस्त्यावर धावल्यानंतर आता पूर्व व पश्चिम उपनगरातही इलेक्ट्रिकल एसी डबलडेकर बसेस प्रवाशांच्या सेवेत रुजू करण्यात आल्या आहेत.

मुंबई शहर परिसरात 45 AC इलेक्ट्रिक डबलडेकर बसेस चालवणार :

कुर्ला पश्चिम रेल्वे स्थानक ते वांद्रे पूर्व दरम्यान डबलडेकर बसेस प्रवाशांच्या सेवेत आणल्यानंतर आता कुर्ला-अंधेरी, अंधेरी-सीप्झ दरम्यान सोमवार पासून एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. 21 फेब्रुवारी 2023 पासून बेस्टने इलेक्ट्रिक एसी बसेस मुंबई शहर परिसरात प्रवाश्यांच्या सेवेत आणल्या आहेत. मुंबई शहर परिसरात ४५ एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बसेसचे दक्षिण मुंबईत व मुंबई उपनगगरात प्रवर्तन करण्यात येत आहे. नवीन डबलडेकर बसेस मध्ये प्रवाशांच्या सोईसाठी मोबाईल चार्जिंगची व्यवस्था, दोन स्वयंचलित प्रवेशद्वार, सीसीटीव्ही या बसेसमध्ये बसवण्यात आले आहेत.

मुंबई उपनगर मध्ये 20 पेक्षा अधिक बसेस चालवणार :

11 डिसेंबर ( सोमवार ) पासून मुंबई उपनगर परिसरात देखील प्रवाश्यांच्या सोयीसाठी डबलडेकर बसेसची सेवा सुरु करण्यात आली आहे. ३१० या बस मार्गावर वांद्रे बस टर्मिनस ते कुर्ला स्टेशन पश्चिम बस स्थानक या दरम्यान १० बसेस चालवण्यात येत आहेत, तर आणखीन १० वातानुकूलित इलेक्ट्रिक डबल डेकर बसगाड्या सोमवारपासून ३३२ या बस मार्गावर कुर्ला बस आगार ते अंधेरी पूर्व याद्वारे ४१५ या बसमार्गावर आगरकर चौक (अंधेरी पूर्व) ते सीप्झ टर्मिनस या दरम्यान प्रवर्तित करण्याचा निर्णय घेतला आहे.