हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. आता गोव्याला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जायला जास्त वेळ लागणार नाही. लवकरच मुंबई ते गोवा (Mumbai-Goa Expressway) हे अंतर अवघ्या 7 तासांत पार करता येणार आहे. कारण राज्य सरकार मुंबई-गोवा नवा महामार्ग तयार करणार आहे. राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-पुणे महामार्गाच्या धर्तीवर हा महामार्ग बांधण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि त्रास दोन्हीही कमी होणार आहे.
मुंबई ते गोवा हे अंतर 590 किलोमीटर आहे. सध्याच्या महामार्गावरून गोव्याला जायचे म्हंटले तर 12 तसंच प्रवास करावा लागतो. मात्र नवा महामार्ग सुरु होतच हाच प्रवास अवघ्या ७ तासांत होऊ शकतो. याच अर्थ ५ तासांचा वेळ वाचणार आहे. हा महामार्ग 2016 मध्ये प्रस्तावित करण्यात आला होता आणि प्रकल्प पूर्ण करण्याची तात्पुरती अंतिम मुदत 2018 होती. मात्र काही अडचणींमुळे हा प्रकल्प अजूनही पूर्ण होऊ शकला नाही. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी मालवणी महोत्सवादरम्यान या महामार्गाची घोषणा केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांची वाढती संख्या आणि रस्त्याची दुर्दशा पाहता राज्य सरकार समुद्रकिनारी हा नवीन द्रुतगती मार्ग तयार करण्याच्या दृष्टीने काम करत आहे. हे काम एकूण ११ टप्प्यांमध्ये होणार आहे. युनायटेड स्टेट्समधील लॉस एंजेलिस-सॅन फ्रान्सिस्को महामार्ग 1 च्या धर्तीवर हा मार्ग बांधण्याची सरकारची योजना आहे. राज्याच्या कोकण विभागातील सिंधुदुर्गकडे जाणार्या कोस्टल रोडचेही रुंदीकरण करण्यात येणार आहे.
.दरम्यान, केंद्र सरकार मुंबई आणि कन्याकुमारी दरम्यानच्या मोठ्या 1,622 किमी-लांब कॉरिडॉरचा भाग म्हणून मुंबई-गोवा महामार्ग आधीच डेव्हलप करत आहे. हा मार्ग म्हणजे मुंबई-कन्याकुमारी या भल्यामोठ्या महामार्गाच्या कॉरिडॉरचा एक भाग आहे. हा कॉरिडॉर पश्चिम घाटाला समांतर असून तो महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू यांसारख्या किनारी राज्यांमधून जातो