हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणेशोत्सव म्हंटलं की, आपल्या सर्वांच्या अंगात वेगळीच ऊर्जा संचारते. कोकणात तर गणेशोत्सव अगदी उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. मूळचे कोकणाचे असणारे परंतु नोकरीसाठी मुंबई- पुणे याठिकाणी असलेले चाकरमानी दरवर्षी गणेशोत्सव काळात सुट्टी टाकून गावी जातात. त्यामुळे मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Goa Highway) मोठी वर्दळ पाहायला मिळते . यावर्षी गणेशोत्सवाला 19 सप्टेंबर पासून सुरुवात होणार असून चाकरमानी त्यापूर्वीच कोकणात जाण्यासाठी निघतात. अशावेळी महामार्गवरील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने काही ठोस निर्णय घेतले आहेत.
16 सप्टेंबरपासून अवजड वाहनांना नो एंट्री –
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Goa Highway) वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रशासनाने 16 टन पेक्षा जास्त वजन असणाऱ्या गाडयांना या महामार्गावर प्रवेश बंदी केली आहे. त्यानुसार, आता 16 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजल्या पासून अशा अवजड वाहनांना मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर एंट्री मिळणार नाही. म्हणजेच ज्या वाहनांचे वजन 16 टन पेक्षा अधिक आहे, अशी वाहने 16 सप्टेंबर पासून ह्या महामार्गवरून प्रवास करू शकणार नाही. 19 सप्टेंबर सकाळी 8 वाजेपर्यंत ही बंदी कायम राहील.
कधीपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी? Mumbai Goa Highway
काही ठिकाणी ५ व ७ दिवसांचे गौरी गणपती असतात. त्यामुळे ५ व ७ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर काही चाकरमानी परतीचा प्रवास करत करतात. अशा प्रवाशांसाठी पुन्हा २३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. पासून ते २५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वा. पर्यंत अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. याशिवाय अनंत चथुर्दशीला विसर्जन झाल्यानंतर परतीचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचा त्रास होवू नये यासाठी सकाळी ८ वा. पासून २९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वा. पर्यंत अवजड वाहतूक बंद असणार आहे. परंतु अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या वाहनांना मात्र या महामार्गावरुन प्रवास करताना सुट मिळणार आहे.
अवजड वाहनांसाठी ‘हा’ आहे पर्यायी मार्ग
या काळामध्ये अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागेल. अवजड वाहने या काळात मुंबई – खालापूर – पाली – रायगड – महाड – खेड असा पर्यायी मार्गाचा प्रवास करू शकतात . खालापूर ते पाली राज्यमहामार्ग 93 ने प्रवास करू शकतात . तर पुढे राज्यमहामार्ग 96 ने प्रवास शक्य होईल.