हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या नावांवर निर्णय केव्हा घेणार?, असा सवाल हायकोर्टानं राज्यपालांच्या सचिवांना केला आहे. हायकोर्टाच्या रोखठोक भूमिकेनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना धक्का दिल्यानं आता या वादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात.
राज्य सरकारबरोबरच्या संघर्षामुळंच राज्यपालांनी 12 आमदारांच्या शिफारशीवर निर्णय घेतला नाही, असा युक्तिवाद श्रीवास्तव यांनी केला. इतर राज्यांमध्ये एका दिवसात निर्णय झाल्याची उदाहरणं त्यांनी कोर्टाला दाखवून दिली. घटनादत्त अधिकारांचं वहन करण्यात राज्यपाल अपयशी ठरल्याचा आरोपही याचिकेत लावण्यात आलाय.
राज्यपालांनी निर्णय का घेतला नाही याची कारणे प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी असे निर्देश हायकोर्टानं दिलेत. मंत्रिमंडळानं दिलेल्या नावांचा कधी विचार करणार तेही प्रतिज्ञापत्रात सांगावे, असं कोर्टानं म्हंटलंय. राज्यपालांनी काही तरी निर्णय घ्यायला पाहिजे असंही कोर्टानं निरीक्षण नोंदवलं.