मुंबईचा ‘सूर्य’ तळपला ; आरसीबीवर 5 गडी राखून दणदणीत विजय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सूर्यकुमार यादवच्या धडाकेबाज 79 धावांचा जोरावर गतविजेत्या मुंबई इंडियन्सने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू वर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. आणि ‘प्ले ऑफ’ मध्ये स्थान मिळवले.या सामन्यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी केली पण चांगल्या सुरुवाती नंतरही त्यांची मजल 164 पर्यंतच पोचली. सुर्यकुमार यादवच्या जोरावर मुंबईने हे आव्हान आरामात पार केल.

पाच गडी राखत मुंबईनं बंगळुरू संघाला पराभूत केलं आणि यंदाच्या वर्षीच्या IPL 2020 मधील या हंगामात प्ले ऑफमधील स्थान भक्कम केलं. देवदत्त पडिक्कलच्या शतकी खेळीच्या बळावर बंगळुरूच्या संघानं प्रथम फलंदाजी करत मुंबईसमोर 164 धावांचा डोंगर रचला. याच आव्हानाला सामोरं जाण्यासाठी मुंबईचा संघ मैदानावर आला.

क्विंटन डिकॉक अवघ्या 18 धावांवर बाद झाला. त्यामागोमाग इशान किशनही फार काळ खेळपट्टीवर टीकू शकला नाही. कृणाल आणि हार्दिक पांड्यालाही प्रभावी खेळ करता आल नाही. एकिकडे संघाची ही अवस्था असतानाच दुसरीकडे सूर्यकुमार यादवनं मात्र खऱ्या अर्थानं संघाला विजयी टप्प्यावर आणलं. 43 चेंडूंमध्ये त्यानं 10 चौकार आणि 3 षटकारांची बरसात करत नाबाद 79 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.

तत्पुर्वी, मुंबईचा कर्णधार कायरन पोलार्डने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर देवदत्त पडिकल आणि जॉश फिलिप यांनी बँगलोरला चांगली सुरुवात करुन दिली. या दोघांनी 7.5 ओव्हरमध्येच 71 रन केले. पण यानंतर मुंबईच्या बॉलरनी जोरदार पुनरागमन करत बँगलोरला 164 रनवर रोखलं. जसप्रीत बुमराहने 4 ओव्हरमध्ये फक्त 14 न देऊन 3 विकेट घेतल्या. तर बोल्ट, चहर आणि पोलार्डला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment