Mumbai Local : राज्यातल्या जवळपास सर्वच भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. याचा परिणाम जनजीवनावर झालेला दिसून येतो आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. याचा परिणाम मुंबईच्या लोकलवर झाला असून रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे काही लोकल ठप्प झाल्या आहेत तर काही लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ देखील उडालेली दिसत आहेत. परिणामी मुंबई, ठाण्यातल्या बहुतांशी स्थानकांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. याच गर्दीमुळे एका (Mumbai Local) महिला प्रवाशाचा गंभीर अपघात झाला असून या अपघातात या महिलेला आपले दोन्ही पाय गमवावे लागले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान झालेली आहे. बेलापूर सीबीडी रेल्वे स्टेशन येताना एका महिलेचा पाय अचानक घसारला आणि ही महिला रुळावर पडली. या महिलेच्या अंगावर रेल्वेचा पहिला महिला डबा गेला. या महिलेचा जीव वाचवण्यात यश आलं मात्र या महिलेला या अपघातामध्ये आपले दोन्ही पाय गमवावे लागलेत. रेल्वे आणि पोलीस प्रशासनाने (Mumbai Local) वेळीच रेल्वे मागे घेऊन या महिलेचा जीव वाचवला.
मुंबईत (Mumbai Local) रात्रभर पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पावसामुळे कुर्ला, चुनाभट्टी परिसरात पाणी साचलं होतं. त्यामुळे हार्बर सह अनेक रेल्वे उशिराने धावत होत्या. तर काही रेल्वे रद्द करण्यात आल्या त्यामुळे नागरिकांची कार्यालयात जाण्यासाठी धावपळ सुरू होती. अशातच बेलापूर वरून ठाण्याला जाण्यासाठी रेल्वे नसल्यामुळे प्रवाशांनी रेल्वे पकडण्यासाठी एकच गर्दी केली. या गर्दीमध्ये महिलेचा पाय घसरला आणि ही महिला थेट रेल्वे रुळावर जाऊन पडली आणि या महिलेच्या अंगावरून रेल्वेचा डब्बा गेला. ही बाब तातडीने लक्षात आल्यामुळे रेल्वे प्रशासनानं रेल्वे मागे घेतली आणि या महिलेचा जीव वाचला. मात्र या घटनेमध्ये महिलेला आपले दोन्ही पाय गमवावे लागले.
विमानांच्या दिशा बदलल्या (Mumbai Local)
याशिवाय सततचा पाऊस असल्यामुळे दृश्यमानताही मुंबईमध्ये कमी झालेली दिसून येत आहे. परिणामी मुंबई विमानतळावरील हवाई वाहतुकीवर ही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे जवळपास 27 विमानांच्या दिशा बदलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन (Mumbai Local)
सध्याची मुंबईतील परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी जनतेला आवाहन केलं आहे. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्ट वर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. शिवाय नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या (Mumbai Local) जनतेला केले आहे. मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपात्कालीन यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.