मुंबई लोकलला थांबवण्यात करोना अपयशी, मात्र..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार लोकल ट्रेन काही दिवस बंद ठेवण्याची चर्चा सुरु असताना मुंबईतील लोकल बंद होणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मुंबईतील बस किंवा ट्रेन आम्ही बंद करणार नसून जनतेने अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं. राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

मुंबईत बस आणि लोकल ट्रेन बंद राहणार नाही आहेत. मात्र जनतेने कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नागरिकांनी दिलेल्या सूचना पाळाव्या, स्वतःहून जबाबदारी घेत टाळावी. जर गर्दी जर कमी झाली नाही तर नाईलाजाने सरकारला सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिला. तसेच मुंबईतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व्यापारांनी उघडी ठेवावी असं आवाहनसुद्धा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं. आरोग्याच्या बाबतीतही सगळ्या सूचना आम्ही देण्यात आलेल्या आहेत. सरकारी कार्यालयांना सात दिवसांची सुटी देण्यात आलेली नाही. ५० टक्के उपस्थितीबाबत आम्ही विचार करतो आहोत. सरकारी कर्मचारी कमी उपस्थितीत जास्तीत जास्त काम कसं करु शकतील? याबाबत आम्ही विचारविनीमय करतो आहोत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

दरम्यान, मुंबईसह राज्यातील अनेक शहरांत आता प्लॅटफॉर्म तिकिट खरेदी करण्यासाठी ५० रुपये खर्च करावे लागणार आहेत. करोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने पश्चिम रेल्वेने या किंमती वाढविल्या आहेत. पश्चिम रेल्वे विभागात एकूण ७५८ स्थानके आहेत त्यापैकी ४५० स्थानके ही प्रमुख आहेत. त्यातील सुमारे २५० स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. तसेच करोनाचा धोका लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेत राजधानी, डेक्कन, प्रगती, दुरांतो एक्स्प्रेससह एकूण २३ लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. करोना संसर्ग टाळणे आणि प्रवासी संख्या कमी असल्याचे कारण देत मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत या गाड्या रद्द राहणार आहेत.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment