हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Train । केंद्रातील मोदी सरकारने मुंबईकरांना मोठं गिफ्ट दिले आहे. मुंबईकरांसाठी १६,२०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे १२ रेल्वे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत लोकसभेत माहिती दिली. हे रेल्वे प्रकल्प या प्रदेशातील कनेक्टिव्हिटी आणि रेल्वे सेवांचे सुरळीत ऑपरेशन आणखी वाढवतील असा विश्वास अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला.
लोकसभेत बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले, महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत उपनगरीय रेल्वे सेवा (Mumbai Local Train) आणखी वाढविण्यासाठी सरकारने १६,२४१ कोटी रुपयांच्या १२ पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. भारतीय रेल्वे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर विशेष लक्ष केंद्रित करण्यावर भर देत आहे. त्यानुसार लोकल ट्रेनचे आधुनिकीकरण करणे, प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि मुंबईकरांचा लोकल प्रवास आरामदायी करणे यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. नवीन रेल्वे प्रकल्पांचा उद्देशच मुळात लोकलची गर्दी कमी करणे. लोकलच्या फेऱ्या वाढवणे आणि उपनगरीय प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करणे आहे असं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं.
कोणकोणत्या रेल्वे प्रकल्पाना मंजुरी – Mumbai Local Train
अनुक्रमांक | प्रकल्पाचे नाव | लांबी (किमी) | किंमत (रु. कोटींमध्ये) |
1 | सीएसएमटी-कुर्ला पाचवी आणि सहावी लाईन (एमयूटीपी-II) | 17.5 | 891 |
2 | मुंबई सेंट्रल-बोरिवली सहावी लाईन (एमयूटीपी-II) | 30 | 919 |
3 | गोरेगाव-बोरिवली पासून हार्बर लाईनचा विस्तार (एमयूटीपी-IIIA) | 7 | 826 |
4 | बोरिवली-विरार पाचवी आणि सहावी लाईन (एमयूटीपी-IIIA) | 26 | 2184 |
5 | विरार-डहाणू रोड तिसरी आणि चौथी लाईन (एमयूटीपी-III) | 64 | 3587 |
6 | पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉर (एमयूटीपी-III) | 29.6 | 2782 |
7 | रोली-कळवा (उन्नत) उपनगरीय कॉरिडॉर लिंक (एमयूटीपी-III) | 3.3 | 476 |
8 | कल्याण-आसनगाव चौथी लाईन (MUTP-IIIA) | 32 | 1759 |
9 | कल्याण-बदलापूर तिसरी आणि चौथी लाईन (MUTP-IIIA) | 14 | 1510 |
10 | कल्याण-कसारा तिसरी लाईन | 67 | 793 |
11 | नायगाव-जुईचंद्र डबल कॉर्ड लाईन | 6 | 176 |
12 | निळजे-कोपर डबल कॉर्ड लाईन | 5 | 338 |
या नव्या रेल्वे प्रकल्पांच्या मंजुरीनंतर आता मुंबईकरांचा प्रवास सुखद आणि आरामदायी होणार आहे. मुंबई लोकलची गर्दी कमी होऊन गाड्यांची संख्या वाढणार आहे. परिणामी मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. तसेच गर्दीतून थोडीफार का होईना सुटका होणार आहे. खऱ्या अर्थाने मुंबईची लाईफलाईन बदलणार आहे.