Mumbai Local Train : लोकल ट्रेनमध्ये AC सुविधा मिळणार!! मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार

Mumbai Local Train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Train । मुंबई लोकल ट्रेन मधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र लोकल ट्रेन मध्ये मागच्या काही दिवसांत सुरक्षिततेचा मुद्दा निर्माण झालाय. त्यातच मुंब्रा येथे झालेल्या अपघातानंतर हा विषय आणखी चर्चेत आला. यानंतर आम्ही लवकरच लोकल ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक बंद होणारे दरवाजे बसवू आणि अशी माहिती प्रशासनाने दिली होती. अखेर आता याला केंद्र सरकारचीही मंजुरी मिळाली आहे. मुंबईतील उपनगरीय गाड्यांचे सर्व डबे स्वयंचलित दरवाजे असलेल्या वातानुकूलित दरवाज्यांनी बदलण्याची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. स्वतः रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत आपल्याला माहिती दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सांगितलं.

कोणतीही भाडेवाढ नाही- Mumbai Local Train

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना सध्याची भाडेवाढ न करता उपनगरीय गाड्यांना मेट्रोसारखे डबे बसवण्याची विनंती केली होती. आज सकाळी मुंबईत असलेल्या रेल्वेमंत्र्यांनी मला सांगितले की ते या संदर्भात सकारात्मक निर्णय घेत आहेत आणि ते लवकरच अधिकृत घोषणा करतील. परंतु नवीन वातानुकूलित कोचमध्ये स्वयंचलित दरवाजे असतील, आणि महत्वाची बाब म्हणजे मुंबईकरांना कोणत्याही भाडेवाढीचा सामना करावा लागणार नाही यावर फडणवीसांनी जोर दिला.

दोन दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लोकल ट्रेन मधील (Mumbai Local Train) गर्दी कमी करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास ऑफिसवर पोहचायला सूट दिली आहे. मात्र सकाळचा हा अर्धा तास सदर सरकारी कर्मचाऱ्यांना संध्याकाळी भरून काढावा लागेल. म्हणजेच काय तर त्यांच्या कामाच्या तासांत कोणताही बदल होणार नाही. कार्यालयातील गर्दी कमी करणे. तसेच मुंबईतील रेल्वे व्यवस्थेवरील ताण कमी करणे. हे या निर्णयामागचे उद्दिष्ट आहे. तसेच राज्यातील मंत्री प्रवाशांना मेट्रो ट्रेन आणि इतर सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायी पद्धती वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

दुसरीकडे, मध्य रेल्वेने (Mumbai Local Train) मुंबई उच्च न्यायालयाला सादर केलेल्या धक्कादायक आकडेवारीनुसार, गेल्या 8 वर्षात तब्बल 8273 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे २०२५ च्या पहिल्या केवळ पाच महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते मे अखेरपर्यंत ४४३ मुंबईकरांनी रेल्वे रुळ ओलांडताना आणि धावत्या लोकल ट्रेनमधून पडून आपला जीव गमावला आहे. या आकडेवारीमुळे मुंबई लोकल ट्रेन मधील प्रवास किती असुरक्षित आहे हे स्पष्ट होत आहे.