हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट झाली असून राज्य सरकारने हळू हळू निर्बंध शिथील केले आहेत. महाराष्ट्र अनलॉक होत असताना मुंबईकरांचासाठी जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल कधी सुरू होणार असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लोकल इतक्यात सुरू होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
मुंबईची लोकल कधी सुरू होणार?, असा सवाल वडेट्टीवार यांना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, कोरोना संपेपर्यंत मुंबईत लोकल सुरू होणार नाही, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातून कोरोना गेलेला नाही. काही जिल्ह्यात अजूनही कोरोनाची चिंताजनक स्थिती आहे. त्यामुळे स्वत:हून मृत्यूला आमंत्रण देऊ नये. सर्वांनी कोरोनाचे नियम पाळावेत, असं आवाहन त्यांनी केलं.
दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबई लोकलबाबत भाष्य केलं आहे. सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. या संदर्भातील निर्णय पालिकेने घेतलेला नाही, असं किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे