हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरनिशाणा साधला. यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून “अमृता फडणवीसांच्या ट्विटमध्ये कोणत्याही स्वरूपाचे तथ्य नसून असा कोणी राजा नसतो. आम्ही सर्वजण जनतेचे सेवक आहोत. त्यांच्या घरात कोणी राजा असेल तर.., असे म्हणत पेडणेकर यांनी टोलाही लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेते तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट केले होते. त्यामध्ये त्यांनी “कोणताही माणूस ज्याने ‘मी राजा आहे’ हे दाखवले पाहिजे तो खरा राजा नाही !,” असे म्हंटले होते. अमृता फडणवीसांच्या ट्विटवर महापौर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अमृता फडणवीसांना टोलाही लगावला.
पेडणेकर यांनी म्हंटले आहे की, अमृता फडणवीसांच्या ट्विटमध्ये कोणता अर्थ आहे का? मुळात राजा कोण. या ठिकाणी जनतेने निवडून दिलेले आपण सेवक असतो. आपण राजे नाही. उलट प्रजेपेक्षा खालचं स्थान आहे. प्रजा मोठी आहे. लोकशाही आहे ना. यात राजा काय? असे म्हणत पेडणेकर यांनी अमृता फडणवीसांना टोलाही लगावला आहे त्यांच्या घरात राजा असेल तर मला माहिती नाही, असेही पेडणेकर यांनी म्हंटले आहे.