कोण अमृता फडणवीस? ‘नावडतीचं मिठ अळणी’ अशी त्यांची अवस्था; मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुणे मेट्रो, कोरोना नियमांच्या शिथिलतेवरून महाविकास आघाडी सरकारवर व ठाकरे सरकारवर टीका केली. त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टोला लगावला. “कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ अळणी अशी त्यांची अवस्था झाली आहे, अशा शब्दात पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केयी आहे.

पुणे येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. त्यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

आज पुणे येथे अमृता फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार खूप कुमकुवत आहे. हे सरकार केव्हा पडेल, असे प्रत्येकाला वाटते. जर हे सरकार पडले, तर भाजपा एक चांगला पर्याय देईल, असे म्हंटले आहे. त्यानंतर त्यांना मुंबईच्या महापौर पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Leave a Comment