हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2022 मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे काम सुरु होते. त्यामध्ये MMRDA चा 337 किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील (Mumbai Metro) मेट्रो ‘2अ ‘ आणि ‘मेट्रो 7’ या मार्गिकांचा पहिला टप्पा एप्रिल मध्ये पार पडला. ह्यावेळी प्रवाश्यांची संख्या ही आकदी मोचकीच होती. मात्र पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल – बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी सध्या शुक्रवारपासून ब्लॉक घेण्यात आले असल्यामुळे लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्या आहेत. आणि इकडे मेट्रोचे प्रवासी लाखो पार गेले.
लोकलचे सध्या ब्लॉक सुरु असून अनेक गाड्या रद्द झाल्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून ‘दहिसर – अंधेरी मेट्रो 2 अ ‘ आणि ‘ दहिसर – गुंदवली मेट्रो 7’ च्या प्रवासी संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. मार्गिकांवरील प्रवासी संख्या ही तब्बल 2.5 लाखावर गेली होती. त्यामुळे ही ह्या दोन्ही मार्गीकांसाठी महत्वाची बाब मानली जात आहे.
सुरुवातीला प्रवाश्यांची संख्या हजारवर होती :
जेव्हा ह्या दोन मार्गीकांपैकी एक मार्गीक सुरु झाली तेव्हा ह्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही सुरुवातीला 30 हजारावर होती. त्यानंतर 2023 साली ह्याचा दुसरा टप्पा सुरु करण्यात आला तेव्हा प्रवासी संख्या ही प्रतिदिन 1 लाख 60 हजारावर पोहोचली. त्यामुळे हे मार्गीकांचे यश मानले जाते.
जूनमध्ये 2 लाख पार :
मेट्रोची सेवा (Mumbai Metro) ही नागरिकांना आवडायला लागली आणि दिवसागणिक ह्याचे प्रवासी वाढत गेले. जानेवारीत असलेली 1 लाखाची संख्या ही जून मध्ये 2 लाखाच्या पार गेली. आणि आता मध्य रेल्वेचे ब्लॉक सुरु असल्यामुळे प्रवासी ह्यास पर्यायी मार्ग म्हणून प्रवास करत आहेत. त्यामुळे मेट्रोची संख्या ही अडीच लाखावर येऊन ठेपली आहे.
‘मेट्रो 2 अ’ चा मार्ग कोणता? Mumbai Metro
मुंबई मेट्रो लाईन 2A मार्गामध्ये पहाडी गोरेगाव, अंधेरी, एकसर, अप्पर दहिसर आणि लोअर दहिसर (पूर्व ) , कांदिवली (पश्चिम), पहाडी एकसर, बोरिवली (पश्चिम), लोअर आशिवरा, लोअर मालाड, मालाड (पश्चिम), मंडपेश्वर, कांदरपाडा, ओशिवरा, वलणई, डहाणूकरवाडी यांचा समावेश आहे. तर मुंबई मेट्रो लाइन 7 हा मुंबईच्या पश्चिम उपनगरांना दहिसर पूर्व ते गुंदवलीपर्यंत आहे. अंदाजे 16.5 किमी अंतर व्यापतो. ह्यामुळे प्रवाश्यांचा प्रवास सुखकर होतो.