Mumbai Metro : मुंबईकरांना मिळालं दिवाळी गिफ्ट!! रात्री 11 पर्यंत धावणार मेट्रो

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी मेट्रो (Mumbai Metro) ही नेहमीच प्रवाश्यांच्या सोयीचा विचार करते. मेट्रोन हजारो लाखो लोक प्रवास करतात. त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते. त्यातच आता सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रोने प्रवासाची वेळ वाढवली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिवाळीचे चांगलेच गिफ्ट भेटले आहे.

एकनाथ शिंदे घेतला निर्णय

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एमएमआरडीएचे सुद्धा अध्यक्ष  आहेत. त्यामुळे त्यांनी प्रवाश्यांची गरज पाहत हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकर आनंदी आहेत. 11 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून हा निर्णय अमलात आणला जाणार आहे. यासाठी मेट्रो 2 अ व मेट्रो 7 वरून रात्री 10:30 ची असलेली शेवटची ट्रेन ही आता 11:00 वाजता सुटणार आहे.

दररोजच्या पेक्षा अर्धा तास अधिक वेळ धावणार मेट्रो (Mumbai Metro)

मेट्रोची रोजची सेवा ही प्रवाश्यांसाठी रात्री 10:30 पर्यत असते. आता त्यात वाढ होणार आहे.  त्यामुळे मुंबईकरांना अधिक वेळ प्रवास करता येईल. दिवाळीच्या गर्दीमुळे प्रवासी हे मेट्रोची वेळ वाढवावी अशी मागणी होत होती. मात्र मुंबईकरांसाठी कायमस्वरूपीच मेट्रोची (Mumbai Metro) वेळ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलं असल्याचे सांगण्यात आले आहे.

मेट्रोच्या वाढणार फेऱ्या

मुंबई मेट्रोचा टाइम वाढवल्यामुळे साहजिकच मेट्रोच्या फेऱ्यात वाढ होणार आहे. त्यामुळे एकूण फेऱ्या या 257 वर येऊन ठेपल्या आहेत. सध्या मेट्रोच्या एकूण 253 फेऱ्या सुरु आहेत. मात्र 11 तारखेपासून सकाळी 5:55 ते रात्री 11 पर्यंत वाढ केल्यामुळे गाडीच्या फेऱ्या 257 होणार आहेत. दहिसर पश्चिम ते गुंदवली तसेच डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिमपर्यंत रात्री 10 नंतर मेट्रोच्या 2 अतिरिक्त फेऱ्या नवीन निर्णयामुळे सुरु होणार आहेत.