हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी असलेले मुंबई आणि नागपूर समृद्धी महामार्गाने जोडल्यनंतर आता शहरांमधील प्रवाशी वाहतूक जलद गतीने करण्यासाठी बुलेट ट्रेन मार्गाचा (Mumbai Nagpur Bullet Train) प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ह्या प्रोजेक्ट साठीचा महत्वाचा असलेला DPR म्हणजेच Detailed project report केंद्र शासनकडे सुपूर्त करण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबई ते नागपूर अशी राजधानी आणि उपराजधानीला जोडणारी बुलेट ट्रेन लवकरच धावू शकते. असं झाल्यास मुंबई ते नागपूर प्रवास अवघ्या ३ तासांत होणार आहे.
मुंबई – नागपूर बुलेट ट्रेन मार्ग कसा असेल : (Mumbai Nagpur Bullet Train)
महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन शहरांना जोडणारा हा प्रकल्प राहणार आहे. यामुळे विदर्भाची मुंबईशी कनेक्टिव्हिटी सुधारणार आहे. या मार्गाची एकूण लांबी 766 किलोमीटर एवढी राहणार आहे. या रेल्वे मार्गावर एकूण 13 स्टेशन विकसित केली जाणार आहेत. जवळपास 68% महामार्ग हा समृद्धी महामार्गाच्या समांतर जाईल. नाशिक जिल्ह्यात मात्र हा रेल्वे मार्ग समृद्धी महामार्गाच्या समांतर नसेल . त्यासाठी केवळ 1250 हेक्टर जमिनीचे संपादन करणे आवश्यक आहे.
खर्च किती?
मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन (Mumbai Nagpur Bullet Train) प्रकल्पासाठी एकूण 1 लाख 70 हजार कोटी रुपयांचा खर्च होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे राज्याच्या 11 जिल्ह्यांच्या विकासाला गती मिळणार आहे. या मार्गावर, बुलेट ट्रेन 320 किमी/ताशी वेगाने जाऊ शकेल , परंतु तिचा वास्तविक वेग अंदाजे 250 किमी/तास असेल.
कोणती असतील प्रमुख रेल्वे स्थानके :
मुंबई ते नागपूर या बुलेट ट्रेनच्या(Mumbai Nagpur Bullet Train) एकूण 13 स्टेशन विकसित केली जाणार आहेत. नागपूर, वर्धा, खापरी, पुलगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, करंजा लाड, मालेगाव, मेहकर, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर ही महत्त्वाची स्टेशन या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अंतर्गत विकसित केली जाणार आहे.