हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Nanded Vande Bharat Express । मुंबई ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेसबाबत महत्वाची अपडेट समोर येत आहे. खरं तर मागील काही महिन्यापासून या ट्रेनची चर्चा सुरु आहे. मुंबई ते जालना वंदे भारत एक्स्प्रेस चाच हा विस्तार आहे. मुंबईहून थेट नांदेडला जोडणारी हि ट्रेन कधीपासून सुरु होणार याकडे मराठवाड्यातील आणि खास करून नांदेडचे प्रवाशी लक्ष्य ठेऊन आहेत. अखेर आता हि वंदे भारत ट्रेन कधी सुरु होणार याबाबतची तारीख जाहीर झाली आहे. 26 ऑगस्ट 2025 रोजी या ट्रेनचे उदघाटन होणार आहे. तसेच 27 ऑगस्ट पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजूर साहिब नांदेड आणि दिनांक 28 ऑगस्ट पासून हजूर साहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अशी रेल्वे सुरु होईल
कस असेल वेळापत्रक- Mumbai Nanded Vande Bharat Express
मुंबई- नांदेड वंदे भारत ट्रेन 27 ऑगस्ट 2025 पासून (Mumbai Nanded Vande Bharat Express) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावरून गुरुवार वगळता रोज दुपारी 13.10 वाजता सुटेल आणि दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, औरंगाबाद, जालना आणि परभणी रेल्वे स्थानकांवर थांबून हजूर साहिब नांदेड येथे रात्री 22.50 वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात हीच ट्रेन 28 ऑगस्ट 2025 पासून हजूर साहिब नांदेड स्थानकावरून बुधवार वगळता रोज सकाळी 05.00 वाजता सुटेल आणि परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, नाशिक रोड, कल्याण, ठाणे आणि दादर रेल्वे स्थानकांवर थांबून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुपारी 14.25 वाजता पोहोचेल.
हि वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Mumbai Nanded Vande Bharat Express) हजूर साहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे अंतर 09 तास 25 मिनिटांत पूर्ण करेल. या ट्रेन मध्ये एक्झिक्युटिव्ह क्लास आणि चेअर कार मिळून एकूण 20 डब्बे असतील. जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेस मध्ये 8 डब्बे होते. त्यात वाढ करून 20 डब्बे करण्यात आले आहेत. त्यामुळे एकाच वेळी जास्तीत जास्त प्रवाशांना प्रवास करता येईल, ते सुद्धा अगदी आरामात…
तिकीट किती असेल?
मुंबई ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या एसी चेअर कारचे तिकीट सुमारे 1750 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कारचे तिकीट 3300 रुपयांपर्यंत राहील असा दावा करण्यात येत आहे. मुंबई ते जालना वंदे भारत ट्रेनचा विस्तार थेट नांदेड पर्यंत करण्यात आल्याने नांदेडवासियांसाठी प्रवास अगदी आरामदायी होणार आहे. या ट्रेनचा ७ जिल्ह्याना आणि १० रेल्वे स्थानकांना फायदा होणार आहे.




