हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या देशात अनेक मोठं मोठे महामार्ग तयार करण्यात आले आहेत. त्यातील एक म्हणजे मुंबई – नाशिक महामार्ग (Mumbai Nashik Expressway). त्यामुळे मुंबई – नाशिक महामार्गावर वाहणांची वर्दळही मोठी आहे. मात्र असे जरी असले तरी या महामार्गावर होणाऱ्या अपघातांकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. कारण मागच्या दहा महिन्यात या मार्गावर तब्बल 657 अपघात झाले आहेत. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा तरी ठरत नाही ना असा प्रश्न निर्माण झालाय आहे.
370 लोकांनी गमावला जीव-
मुंबई – नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik Expressway) वाहणाची संख्या प्रचंड मोठी असून त्यामुळे येथे होणाऱ्या अपघाताची संख्याही वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे मुंबई – नाशिक महामार्गावर मागच्या दहा महिन्यात म्हणजेच जानेवारी ते ऑक्टोबर मध्ये तब्बल 657 अपघात झाले असून यामध्ये 370 जणांनी आपला जीव गमवला आहे. वाहतुकीच्या नियमाचा भंग केल्यामुळे तसेच वाहनचालकांच्या हलगर्जीपणामुळे हे अपघात घडून आले आहेत. तसेच या मार्गावर मागच्या काही वर्षांपासून अवजड वाहणांची वर्दळ वाढली आहे. हा महामार्ग गावालगतच्या स्थानिक रस्त्याला जोडलेले आहेत. त्यामुळे भरधाव वाहणामुळे येथे अपघात घडून येतात. त्यामुळे येथील अपघाताला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
कोणत्या वर्षात किती अपघात झाले? Mumbai Nashik Expressway
2019 मध्ये या महामार्गावर एकूण 815 अपघात झाले होते. त्यामध्ये 413 अपघातात 472 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 2021 मध्ये 815 अपघात झाले होते. त्यामध्ये ऐकू 472 जणांनी आपला जीव गमवला होता. 2022 मध्ये अपघाताची संख्या 768 होती तर यामध्ये मृत्यू 481 एवढे झाले होते. तर 2023 मध्ये ऑक्टोबर पर्यंत ही संख्या 657 एवढी झाली असून यामध्ये 370 जणांनी आपला जीव गमवला आहे. त्यामुळे ही संख्या वर्षागणीक वाढत असून यावर उपाययोजना करणे तितकेच महत्वाचे आहे.