Mumbai New Terminus : मुंबईत उभारतंय नवीन टर्मिनस!! पहिला टप्पा कधी सुरु होणार

Mumbai New Terminus
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai New Terminus : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईत लवकरच नवीन टर्मिनस उभारलं जातंय. पश्चिम रेल्वे लाईनवर जोगेश्वरी येथे हे नवीन टर्मिनस उभारलं जातंय. तब्बल तीन दशकांनंतर मुंबईला एक नवं रेल्वे टर्मिनस मिळणार असून मुंबईकरांचा प्रवास सोप्पं होणार आहे. हे टर्मिनस कार्यान्वित झाल्यानंतर मुंबईतून धावणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांना आणखी एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

कधी सुरु होणार जोगेश्वरी टर्मिनस – Mumbai New Terminus 

जोगेश्वरी टर्मिनस हे मुंबईतील पश्चिम रेल्वेचे चौथे रेल्वे टर्मिनस ठरणार आहे. जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळील सध्याच्या सहाय्यक टर्मिनल (एटी) यार्डमध्ये हा प्रकल्प विकसित केला जात आहे. आतापर्यंत केवळ गाड्या उभ्या करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या यार्डमध्ये प्रवासी वाहतूक नव्हती. मात्र, टर्मिनस सुरू झाल्यानंतर प्रवाशांसाठी ते गेमचेंजर ठरेल. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 76.48 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जोगेश्वरी टर्मिनसचा पहिला टप्पा जून 2026 मध्ये प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला हा प्रकल्प डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र कंत्राटदार बदल, जागेसंबंधी अडचणी आणि प्रशासकीय कारणांमुळे कामात उशिर झाला . Mumbai New Terminus

जोगेश्वरी टर्मिनसच्या पहिल्या टप्प्यात दोन प्रवासी प्लॅटफॉर्मसह पूर्ण विकसित कोचिंग टर्मिनस उभारण्यात येणार आहे, यातील एक प्लॅटफॉर्म एक स्टेशनच्या बाजूला असेल आणि दुसरा दोन रुळांच्या मध्ये असेल. या दोन नवीन प्लॅटफॉर्म मुळे एकाच वेळी तीन लांब पल्ल्याच्या गाड्या हाताळणे शक्य होणार आहे. पहिल्या टप्प्यात दररोज 12 जोड्या लांब पल्ल्यांच्या गाड्या चालवण्याची क्षमता असेल. दुसरा टप्पा मार्च 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त प्लॅटफॉर्म, पिट लाइन आणि शंटिंग नेक उभारण्यात येणार आहे. त्यानंतर जोगेश्वरी टर्मिनसवरून दररोज 24 लांब पल्ल्यांच्या गाड्या धावतील. मुंबईच्या रेल्वे वाहतुकीसाठी हा प्रकल्प अतिशय महत्वाचा असणार आहे.