Mumbai News : भारतीय जेवणामध्ये जिरे हे दररोज वापरले जाणारे मसाल्याचे पदार्थ आहे. पनीर, दूध इतर पदार्थात भेसळ झाल्याचे आपण ऐकले असेलच मात्र आता जिऱ्यातही लाकडी भुशाची भेसळ झाल्याचे उघडकीस आले आहे. चला जाणून घेऊया नक्की काय आहे हे प्रकरण ?
भिवंडीतील (Mumbai News) शांतीनगर पोलिसांनी बनावट जिरे बनवून हॉटेल आणि केटरर्सना मोठ्या प्रमाणात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 7.19 लाख रुपये किमतीचा लाकडाच्या भुसापासून बनवलेले सात टन बनावट जिरे जप्त केले आहेत. आरोपींकडून चार लाख रुपये किमतीचा बोलेरो पिकअप टेम्पो, पालघर येथील कारखान्यातील ३० लाख रुपयांची मशिनरी आणि कच्चा मालही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी टेम्पोमधून 80 पोत्यांमध्ये भरलेले 2399 किलो वजनाचे बनावट जिरे जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे व पोलीस हवालदार क्षीरसागर यांना दोन जण शांतीनगर (Mumbai News) पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाखो रुपये किमतीचे बनावट जिरे विकण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तत्काळ ही माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांना दिली.
पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे व सहायक पोलिस आयुक्त किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुरेश घुगे, पोलिस नाईक किरण जाधव, श्रीकांत पाटील, नरसिंग क्षीरसागर, रवी पाटील यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी इंद्रजित चिलावटे यांच्या पथकाने सापळा (Mumbai News) रचला. नागाव येथील फातिमा नगर व एका टेम्पोला संशयाच्या आधारे अडवले. टेम्पोची झडती घेतली असता, अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने बनावट जीऱ्याची एक खेप जप्त केली, जी लाकडी भुसीवर विविध रासायनिक पावडर लेप करून तयार केली होती. जिरे पाण्यात टाकल्यावर ते पूर्णपणे विरघळले. पाणीही काळे झाले. खातरजमा केल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी इंद्रजित चिलावते यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी टेम्पो चालक शादाब इस्लाम खान (३३, नवलीफाटा- पालघर (पु.) आणि चेतन रमेशभाई गांधी (३४, डहाणूकर वाडी, कांदिवली (पु)) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांना अटक केली.
अशा प्रकारे बनावट जिरे बनवले जात होते (Mumbai News)
चौकशीत चेतन रमेशभाई गांधी याने पालघर जिल्ह्यातील नांदोर येथील नॉव्हेल इंडस्ट्रियल इस्टेट येथील जागृती (Mumbai News) एंटरप्रायझेसमध्ये बनावट जिरे तयार करण्याचा कारखाना सुरू केल्याचे उघड झाले. त्यांच्याकडे शासनाचा कोणताही नोंदणी परवाना नाही. पोपट या ब्रँड नावाने हे बनावट जिरे विकले जात होते. मोठ्या एका बडीशेपच्या आकाराचा कच्चा माल आणायचा, त्याला रंग देऊन खऱ्या जिऱ्यात मिसळून पॅकिंग करायचे. APMC मार्केट तसेच ठाणे, पालघर, मुंबई आणि गुजरात विभागातील हॉटेल्स आणि केटरर्सना घाऊक किमतीत विकले जाते.