फार्मा कंपनीकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा मोठा साठा? मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर फडणवीस-दरेकर पोचले उपायुक्तांच्या कार्यालयात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना रेमडेसिविर इंजेक्शन च्या तुटवड्या वरून केंद्र आणि राज्य सरकार मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान दमणच्या ब्रूक फार्मा (Bruck Pharma) या कंपनीकडे तब्बल 60 हजार रेमडेसिव्हीरचा साठा असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. यामुळे पोलिसांनी राजेश डोकानिया याना अटक केली. विशेष गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी याच कंपनीत जाऊन महाराष्ट्रासाठी काही इंजेक्शन्स बूक केली होती.

राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या नंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी तात्काळ बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात धाव घेत याविषयी जाब विचारला. त्यावेळी पोलिसांनी आम्ही राजेश डोकानिया यांना केवळ चौकशीसाठी बोलावले होते, असे स्पष्ट केले.

या सगळ्या घटनाक्रमानंतर फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला. ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याच्या ओएसडीने राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिली. तुम्ही या इंजेक्शन्सची निर्यात कशी करु शकता, असा जाब त्यांनी डोकानिया यांना विचारला. त्यानंतर राजेश डोकानिया यांच्या घरी पोलीस पाठवून त्यांना उचलून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ठाकरे सरकार दबावाचे राजकारण खेळत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे आता या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

12 एप्रिल रोजी भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनी दमन येथे जाऊन ग्रुप फार्मा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला (Group Farm Pvt. Ltd. daman) भेट दिली होती. या कंपनीकडून मोठा इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाला होता. त्यामुळे भाजपकडून राज्याला 50,000 रेमडेसीवीर इंजेक्शनची देण्याची घोषणा करण्यात आली होती. या भेटीच्या वेळी  राजेश डोकनिया हे त्यावेळी उपस्थितीत होते.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.