मुंबई । पोलीस दलासाठी उपयुक्त अशा ‘सेगवे’चे( सेल्फ बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर ) गुरुवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते येथे झाले. मुंबई पोलिसांनी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाली आहे. या नवीन सेवेमुळे मुंबई पोलीस अधिक गतिमान झाले आहेत, असे अनिल देशमुख यांनी सांगितलं. या उद्घाटनावेळी आमदार रोहित पवार मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त दक्षिण विभाग निशिथ मिश्रा तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात अशा प्रकारची यंत्रणा पोलिसांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही गृहमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. पोलिसाच्या मास्कला माईक लावण्यात येणार आहे. याद्वारे लोकांना गर्दीच्या ठिकाणी सुरक्षितते संदर्भात सूचना देऊ शकतील, तसेच त्यांच्या मदतीला पब्लिक अड्रेस सिस्टीम असलेले अत्याधुनिक ड्रोन देखील आहेत. त्याचाही उपयोग होऊ शकेल, असे देशमुख यावेळी म्हणाले.
पोलिसांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘सेल्फ बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर’ चे (सेग वे) गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांच्या हस्ते उद्घाटन. आमदार @RRPSpeaks , मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त दक्षिण विभाग निशिथ मिश्रा आदी उपस्थित. pic.twitter.com/x2mFOXbQxi
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 11, 2020
मरिन ड्राईव्ह येथे ५० सेगवेचे उद्घाटन करण्यात आले. यातील १० सेगवे हे वरळीसाठी तर ५ नरिमन पॉइंटसाठी आहेत. त्याचप्रमाणे बांद्रा, जुहू, वर्सोवा या ठिकाणी देखील हे ‘सेग वे’ देण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्राचे पोलीस दल हे जागतिक पोलिसिंग स्टॅंडर्ड नुसार अत्याधुनिक सुसज्ज अशा साधन सामग्रीने भक्कम करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरविले आहे. त्यानुसार या सेग वे चे उद्घाटन करण्यात आले असल्याची माहिती देशमुख यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in