हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. या नोटीसीनंतर त्यांनी राज्य सरकार वर टीकेची झोड उठवली. पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांच्या बदली घोटाळ्याच्या संदर्भातील माहिती मी केंद्रीय गृहसचिवांना दिली आहे त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राज्यातील अधिकाऱ्यांचा बदली घोटाळा मी उघडकीस आणला होता. दिल्लीत केंद्रीय गृहसचिव यांना मी सगळी माहिती सादर केली. कोर्टानं त्याचं गांभीर्य ओळखून CBI ला चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ऑफिशियल सिक्रेट माहिती लीक कशी झाली याचा FIR महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केला. मला काल CRPC नोटीस मुंबई पोलिसांनी पाठवली. उद्या 11 वाजता BKC सायबर ठाण्यात बोलावलं आहे. माझ्या माहितीचा स्रोत मला विचारला जाऊ शकत नाही. तरीही मी स्वतः तेथे जाणार आहे. पोलीस जी काही चौकशी करतील त्याला योग्य उत्तर मी देणार आहे, असं फडणवीसांनी सांगितलं.
अपेक्षा इतकीच की माहिती बाहेर कशी आली याचा तपास करण्यापेक्षा, 6 महिने सरकार कडे हा अहवाल पडला होता, कोणी किती पैसे दिले कोणाला कुठली बदली झाली ही माहिती आहे, अशी सर्व माहिती त्यात असताना सरकारवर कारवाई झाली पाहिजे की ज्यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांच्यावर झाली पाहिजे असे फडणवीस यांनी म्हंटल.