मुंबई प्रतिनिधी | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सात दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. तळेगाव टोलनाका ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ला जोडणाऱ्या मार्गिकेवरील धोकादायक दरडींचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. धोकादायक दरडींचे काम करण्यासाठी १४ मे ते १७ मे आणि २१ मे ते २३ मे दरम्यान हा ब्लॉक असेल.
ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत दर तासाला १५ मिनिटांकरिता वाहतूक बंद करण्यात येणार आहे. यावेळी एकूण ६ ब्लॉक असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी महामार्ग पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तो ब्लॉक पुढील प्रमाणे असेल.
पहिला ब्लॉक हा १.१०.०० ते १०.१५, दुसरा ब्लॉक हा ११.०० ते ११.१५, तीसरा ब्लॉक १२.०० ते १२.१५, चौथा ब्लॉक हा २.०० ते २.१५, पाचवा ब्लॉक ३.०० ते ३.१५ आणि सहावा ब्लॉक हा ४.०० ते ४.१५ याप्रमाणे ब्लॉक घेण्यात येणार आहे.