हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलच्या स्थानकांना (Mumbai Railway Stations) आता नवं नाव मिळणार आहे. मुंबईतील काही रेल्वे स्थानकांची नावे ब्रिटिशकालीन आहेत, मात्र आता त्या नावात बदल करून स्थानकांना नवीन नावे देण्यात यावी अशी मागणी खासदार राहुल रमेश शेवाळे (Rahul Shewale) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. शेवाळे यांच्या या मागणीला राज्य सरकारने तत्वतः मंजुरी दिली असून कॅबिनेट निर्णयानंतर राज्य सरकारच्या वतीने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे.
राहुल शेवाळे यांनी याबाबत सोशल मीडियावर म्हंटल कि, भारतीय पारतंत्र्याच्या खुणा पुसून टाकण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेत असताना मुंबईतील रेल्वे स्थानकांची (Mumbai Railway Stations) ब्रिटिशकालीन नावे देखील बदलायला हवी, अशी मुंबईकरांची भावना होती. म्हणून यासंदर्भात माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारच्या वतीने या प्रस्तावाला तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. या मागणीनुसर पुढील रेल्वे स्थानकांच्या नावांमध्ये असा बदल करण्याबाबत राज्य सरकारकडून केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला जाणार.
1) करी रोड – लालबाग
2) सँडहर्स्ट रोड – डोंगरी
3) मरीन लाईन्स – मुंबादेवी
4) चर्नी रोड – गिरगाव
5) कॉटन ग्रीन -काळाचौकी
6) डॉकयार्ड – माझगाव
7) किंग्ज सर्कल – तीर्थंकर पार्श्वनाथ
8) मुंबई सेंट्रल – नाना जगन्नाथ शंकरशेट
यापूर्वीही स्थानकांची नावे बदलली- Mumbai Railway Stations
दरम्यान, यापूर्वीही मुंबईतील अनेक लोकल रेल्वे स्थानकांची नावे (Mumbai Railway Stations) बदलण्यात आली आहेत. सर्वात प्रमुख म्हणजे व्हिक्टोरिया टर्मिनस ज्याचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले. त्यानंतर ओशिवरा स्थानकाचे राम मंदिर आणि एल्फिन्स्टन रोडचे प्रभादेवी असे नामकरण करण्यात आले होते. आता यामध्ये आणखी 8 रेल्वे स्थानकांची भर पडली असून त्यांचीही नावे लवकरच आपल्याला बदलताना दिसतील.