Mumbai Solapur Vande Bharat Train : आजपासून मुंबई-पुणे-सोलापूर वंदे भारत ट्रेनमध्ये मोठा बदल

Mumbai Solapur Vande Bharat Train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Solapur Vande Bharat Train। मुंबई ते सोलापूर व्हाया पुणे वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये आजपासून मोठा बदल पाहायला मिळणार आहे. मुंबई -सोलापूर या वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. आजपासून या एक्सप्रेस ट्रेनला २० डब्बे मिळणार आहे. यापूर्वी मुंबई -पुणे – सोलापूर एक्सप्रेस ट्रेनला १६ डब्बे होते. मात्र आता आजपासून २० डब्यांना घेऊन हि वंदे भारत ट्रेन धावेल. त्यामुळे प्रवाशांना गर्दीपासून सुटका मिळेल आणि अधिकाधिक सोयीचा लाभ घेता येईल. रेल्वे विभागाने ४ डब्बे वाढवल्याने २० ते ३० टक्के प्रवासी संख्या आणखी वाढेल.

खरं तर मुंबई पुणे सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस (Mumbai Solapur Vande Bharat Train) ट्रेनच्या डब्यांची संख्या वाढवण्यासाठी गेल्या ४-५ महिन्यांपासून मागणी केली जात होती. या वाढत्या मागणीनंतर रेल्वे बोर्डाकडे यासंदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आला होता. अखेर हा प्रस्ताव मंजूर झाला. आजपासून या मार्गावर २० डब्याची वंदे भारत ट्रेन धावेल. रेल्वे विभागाच्या या निर्णयामुळे प्रवाशांना तिकीट उपलब्ध होण्यासही मदत झाली आहे आणि महत्वाची बाब म्हणजे वाढत्या गर्दीपासून सुटका मिळाली आहे. दररोज हजारो प्रवासी या ट्रेनमधून प्रवास करतात. मुंबई वरून सोलापूरला देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे या ट्रेनला गर्दी असते. आणि दुसरी बाब म्हणजे हि वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन पुण्यावरून जात असल्याने पुणेकर प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते.

वंदे भारत एक्सप्रेसचे डबे वाढवावेत, अशी मागणी अनेक महिन्यांपासून होत होती. रेल्वे बोर्डाने अखेर या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आजपासून ही वंदे भारत एक्सप्रेस (Mumbai Solapur Vande Bharat Train) गाडी नियोजित वेळापत्रकानुसार 20 प्रवासी डब्यांसह धावणार आहे. अशी माहिती मध्य रेल्वे, पुण्याचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा यांनी दिली.

कुठून कशी धावते मुंबई सोलापूर वंदे भारत – Mumbai Solapur Vande Bharat Train

मुंबई-पुणे-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस ६ तास ३० मिनिटांत मुंबईवरून सोलापूरला पोहचते. हि वंदे भारत एक्सप्रेस दररोज सायंकाळी ४ वाजता ही एक्स्प्रेस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटते आणि रात्री १० वाजून ३० मिनिटांनी सोलापूर स्थानकावर पोहोचते. दुसऱ्या दिशेने, सकाळी ६ वाजता सोलापूर स्थानकावरून सुटून दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी मुंबईत परत येते. वाटेत हि ट्रेन दादर (Dadar), कल्याण (Kalyan), पुणे (Pune), कुर्डूवाडी (Kurduwadi), सोलापूर (Solapur) आणि दौंड स्थानकावर थांबते.