Mumbai Street Food : मुंबईतील ‘हे’ स्ट्रीट फूड खाऊन तर बघा; जिभेवर चव रेंगाळतच राहील

Mumbai Street Food
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mumbai Street Food) मुंबई…… जिला अनेक लोक धावती नगरी, स्वप्न नगरी आणि माया नगरी म्हणून ओळखतात. मुंबईने आजपर्यंत अनेक आश्रितांना आपलं केलंय. डोळ्यात स्वप्न घेऊन आलेल्या प्रत्येकाला जगण्याची उमेद दिली आहे. इथे येणारा माणूस खिशात आणा घेऊन आला तरी पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईने त्याला कायम ताकद दिली आहे. त्यामुळे आर्थिक राजधानी मुंबई अनेक दिलांची जान आहे. शूट आउट असो किंवा २६/११… मुंबई कधीच दमली नाही, थकली नाही की कधी थांबली नाही.

जरा हटके, जरा बचके.. ये है बम्बई मेरी जान!!

कुणी उगाच मुंबापुरीवर प्रेम करत नाही. इथले गजबजलेले रस्ते आणि रस्त्यांवर लागणारे गाडे यांमुळे गर्दी वाटत असली तरी रस्त्यांची शान आहेत. चौकाचौकातला दुकानदार, चाटवाला, वडापाववाला त्या त्या भागात फेमस असतो. मुंबई नुसती कमावणाऱ्यांची नाही तर खवय्यांचीसुद्धा आहे. (Mumbai Street Food) त्यामुळे मुंबईतील स्ट्रीटफूडचा एक वेगळा दर्जा आहे. अशाच दर्जेदार स्ट्रीटफूडबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. मुंबईतील लोकप्रिय अशा ५ स्ट्रीटफूडची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

1. वडापाव

मुंबईचा वडापाव…. याच्याबद्दल तर बोलू तेव्हढं कमीच. वडापाव कुणाला आवडत नाही? कुणी खाऊन तर बघा. त्याची चव जिभेवरून जाणारच नाही. मुंबईत नाक्यानाक्यावर वडापावचे स्टॉल दिसतात. गरीब श्रीमंतांसाठी या स्ट्रीट वडापावची किंमत कधीच बदलत नाही. (Mumbai Street Food) हिरवी चटणी, लाल सुकी चटणी आणि तळलेली मिरची.. सोबत चुरा असेल तर क्या बात है? असा हा वडापाव कष्टकरी कामगारांसाठी तर त्यांच्या दुपारचं आणि रात्रीच जेवण आहे. चवीला बेस्ट असा हा वडापाव खाऊन एकवेळ पोट भरेल पण मन काही भरणार नाही.

2. चटपटीत भेळ

मुंबईला लाभलेला समुद्र आणि त्यामुळे तयार झालेल्या चौपाट्या फिरायची खरी मजा तर चटपटीत भेळ खाऊनच येते. (Mumbai Street Food) भेळीतही सुखी आणि ओली असे दोन प्रकार मिळतात. जे फार लोकप्रिय आहेत. चणे, शेंगदाणे, कुरमुरे, लाल डाळ, शेव, बटाटा, लाल- हिरव्या चटण्या, कोथिंबीर, मीठ आणि वरून लिंबू अहाहा!! अशी भेळ कागदाच्या पुरचुंडीत पुठ्ठयाच्या चमच्याने खाण्याची मजाच काही वेगळी आहे. चौपाटीवर गेलात तर चटपटीत भेळीचा आस्वाद जरूर घ्या. नुसती भेळ खाण्यासाठी तुम्ही सारखी मुंबई गाठालं.

3. पावभाजी (Mumbai Street Food)

मुंबईच्या रस्त्यांवर प्रसिद्ध असलेला आणखी एक पदार्थ म्हणजे पावभाजी. मान्य… की, हॉटेल- रेस्टोरंटमध्ये तुम्ही भरपूर वेळा पावभाजी खाल्ली असेल. पण मुंबईच्या रस्त्यावर बनवली जाणारी पावभाजी एकदा चाखून बघाच. (Mumbai Street Food) हॉटेलमधल्या पावभाजीला सेकंदात विसरून जाल. पावाचा पहिला घास तोंडात घालताच तो घास कधी विरघळतो आणि मनाला तृप्त करून पोटाची भूक मिटवतो तुमचं तुम्हाला कळणार पण नाही. रात्रीच्या वेळी पावभाजी खायला जाण्याची मजा मुंबईकरांसाठी काही वेगळीच आहे.

4. भुर्जी पाव

रात्रीची बात असेलच आणि पोटात भुकेने वादळ आणलं असेल तर उठा आणि थेट भुर्जी पावचा गाडा गाठा. हे फक्त मुंबईतच होऊ शकत. कारण मुंबईच्या रस्त्यांवर नाक्यानाक्यावर रात्रीच्या वेळी भुर्जी पावाच्या गाड्या असतात. मोठ्या तव्यावर बनवली जाणारी भुर्जी आणि त्यासोबत दिला जाणाऱ्या पावाचा वास तुम्हाला बरोबर ओढत नेतो. (Mumbai Street Food) रात्री भुकेच्या तडाख्यात भुर्जी पाववर उभा आडवा हात मारायची मजा मुंबईकरांना चांगलीच माहितेय. असे बरेच लोक आहेत जे घरी जेवून पुन्हा भुर्जीपाव खायला जातात. मग विचार करा काय कमाल चव असेल.

5. चायनीज फूड

चायनीज खायला चायना मध्ये जायची काही गरज नाही. आजकाल सगळीकडे चायनीज मिळतं. पण मुंबईच्या स्ट्रीट फूडमध्ये चायनीज ज्या पद्धतीने बनवलं जात.. खर्च कमाल!! एकदा खाल्ल्यावर पुन्हा कधी खायला जाऊ असं वाटत. (Mumbai Street Food) चायनीज भेळ, मंचाव सूप, तवा मंचुरियन, शेजवान नूडल्स आणि फ्राईड राईस… असे आणि असे बरेच चायनीज पदार्थ या गाड्यांवर विकले जातात. ज्यांची चव इतकी भन्नाट असते की तरुण मंडळी तर हमखास या गाड्यांवर दिसतात.

काय मग??? मुंबईतील या जबरदस्त स्ट्रीट फूडविषयी वाचून तोंडाला पाणी सुटलं ना?? तर आता तुम्ही कधी ट्राय करताय?