राहुल गांधींचा मुंबईतील मेळावा ढकलला पुढे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर दि. 28 डिसेंबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या मेळाव्याला राज्य सरकारने परवानगी नाकारल्याने काँग्रेसने कोर्टात धाव घेतली होती. दरम्यान हा मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे, अशी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली.

भाई जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईत रद्द करण्यात आलेल्या मेळाव्याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, मुंबईत मेळावा आयोजित करण्यासंदर्भात परवानगी द्यावी अशी आम्ही 15 दिवसांपासून राज्यसरकारकडे मागणी करत होतो. पण आम्हाला उत्तर आले नाही. त्यामुळे आम्ही कोर्टात गेलो. तसेच पुढील मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार करणार आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मुंबईतील मेळाव्याला परवानगी द्यावी म्हणून कोर्टात धाव घेणाऱ्या काँग्रेसने अखेर हा मेळावाच रद्द केला आहे. राज्यावर ओमिक्रॉनचं संकट असल्याने हा मेळावा पुढे ढकलण्यात येत आहे. राज्य सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत. त्याचं पालन करतच काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा केला जाईल, असेही भाई जगताप यांनी सांगितले.

Leave a Comment