मुंबईवरून गोवा केवळ 6 तासांत गाठणार ; ना रेल्वे , ना रस्ते, समुद्रमार्गे होणार थेट प्रवास

0
107
mumbai goa highway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई ते गोवा हे प्रवासप्रेमी आणि पर्यटकांसाठी सर्वात लोकप्रिय मार्ग. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम, सततची दुरवस्था आणि वाहतुकीतील अडथळे यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वेने जाणाऱ्यांसाठीही 8 ते 9 तासांचा वेळ आणि बुकिंगची समस्या कायम आहे. मात्र आता, या सगळ्या अडचणींना मागे टाकत मुंबई ते गोवा प्रवास अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार आहे आणि तेही रस्त्याने किंवा रेल्वेने नव्हे, तर थेट समुद्रमार्गे!

मुंबई-गोवा महामार्गावर तब्बल 14 वर्षांपासून काम सुरू आहे, मात्र अजूनही अनेक भाग अपूर्णच आहेत. नवीन कोकण एक्सप्रेस वे आणि कोकण रेल्वे मार्गावरील सुपरफास्ट गाड्या ही पर्यायी वाहतूक व्यवस्था असली तरी, सततची गर्दी, वेळखाऊ प्रवास आणि अपुऱ्या सुविधा यामुळे प्रवासी हैराण आहेत.
या पार्श्वभूमीवर समुद्रमार्गे जलद वाहतुकीचा पर्याय प्रवाशांसाठी पर्वणी ठरणार आहे.

समुद्रमार्गे प्रवास

एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून मुंबई ते गोवा दरम्यान प्रवासी जहाज सेवा (Ro-Ro Ferry Service) सुरू करण्याचा ambitious प्लॅन आखण्यात आला आहे. ही सेवा मुंबईच्या माजगाव बंदर ते गोव्याच्या मुरगाव बंदर दरम्यान चालवली जाणार आहे. प्रारंभीच्या टप्प्यात 60 प्रवाशांची क्षमता असलेले जहाज प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. ही जलवाहतूक सेवा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करणार असून, प्रवाशांना प्रवासासोबतच समुद्र सफरीचा अनोखा अनुभवही देणार आहे.

समुद्रमार्गाने प्रवासाचे फायदे

मुंबई ते गोवा केवळ 6 तासांत गाठता येणार
रस्ते आणि रेल्वेच्या तुलनेत वेगवान, सुटसुटीत आणि ट्रॅफिकमुक्त अनुभव.

समुद्र सफरीचा आनंद – प्रवासासोबतच निसर्गसौंदर्य, समुद्राचे अप्रतिम दृश्य अनुभवता येणार.
वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे मुंबई-गोवा प्रवास अधिक सोपा आणि आकर्षक होणार.
पर्यटनाला चालना – गोवा आणि कोकणातील पर्यटनाला नवसंजीवनी मिळणार.
पर्यावरणपूरक आणि इंधन बचतीचा पर्याय म्हणूनही हा जलमार्ग उपयुक्त ठरणार आहे.

कधी सुरु होणार ?

महाराष्ट्र आणि गोवा ही दोन्ही राज्यं पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. समुद्रमार्गे जलवाहतूक सुरू झाल्यानंतर या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी पर्यटक प्रवास करणार. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, माजगाव बंदर आणि गोव्यातील मुरगाव बंदर पर्यटन स्थळ म्हणूनही अधिक प्रसिद्ध होणार. क्रूझ टूरिझमला देखील चालना मिळून कोकण किनारपट्टीवर नवे पर्यटन संधी उपलब्ध होणार.