Mumbai Trans Harbour Link | देशातील सर्वात मोठा सागरीपूल असणारा मुंबई ट्रान्स-हर्बर लिंक प्रोजेक्ट मुंबईकरांसाठी 12 जानेवारी रोजी खुला करण्यात आला आहे. या सागरी सेतूला अटल बिहारी वाजपेयी ट्रान्स-हर्बर लिंक असे नाव देण्यात आले आहे. या सागरी सेतूच्या माध्यमातून मुंबई ते नवी मुंबई अंतर अवघ्या अर्ध्या तासात पार करता येणार आहे. या मार्गावरून प्रवास करण्यासाठी सर्वचजण उत्सुक आहेत. परंतु, या मार्गावर काही वाहणांना बंदी घालण्यात आली आहे.
दुचाकी, ट्रॅक्टर आणि ऑटोरिक्षाला घातली बंदी
अटल सेतूवरून जाण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. परंतु असे असताना या मार्गावर दुचाकी, ट्रॅक्टर आणि ऑटोरिक्षा यासारख्या गाडयांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या लोकांकडून निराशा व्यक्त केली जात आहे. तर या मार्गावर कार, टॅक्सी, हलकी मोटार वाहन, मिनीबस आणि टू-एक्सल बसेसला प्रवास करण्याची परवानगी आहे. ट्रान्स-हर्बर लिंक वर (Mumbai Trans Harbour Link) वाहनांना वेग मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत. या मार्गावर अपघात रोखण्यासाठी ही वेग मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामध्ये कार, मिनी बस, टॅक्सी, हलकी मोटार वाहन यासारख्या गाडयांना ताशी 100 किलोमीटर वेगाने प्रवास करता येणार आहे. तर या पुलावर चढताना आणि उतरताना वाहणाचा वेग हा 40 किमी प्रतितास इतका मर्यादित ठेवण्यात आला आहे.
काय होतील या मार्गाचे फायदे? Mumbai Trans Harbour Link
१) मुंबई महानगर परिक्षेत्रातील कनेक्टिव्हिटी सुधारणार :
दक्षिण मुंबई येथील प्रवाश्यांना वाशी पुलावरून नवी मुंबई गाठण्यासाठी 1 ते 2 तास इतका वेळ लागतो. परंतु आता अटल सेतूमुळे फक्त 20 मिनिटात दक्षिण मुंबई मधील प्रवाशी नवी मुंबई शहराला बायपास करून कोकणातील आपला प्रवास जलद गतीने सुरु ठेऊ शकतो. तसेच मुंबई ते पुणे प्रवास देखील अधिक जलद होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीटी बंदराशी कनेक्टिव्हिटी वाढून प्रवास जलद होणार आहे. त्यामुळे मुंबई उपनगर व नवी मुंबई येथील कमी होण्यास मदत होणार आहे.
२) मेट्रोपोलिटन भागात विकासाला गती मिळणार :
अटल सेतू मुळे (Mumbai Trans Harbour Link) मुंबई मेट्रोपोलिटन भागात मोठ्या प्रमाणात विकासाला गती मिळेल. नवी मुंबईच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात अर्थकरणाला गती मिळून मुंबई क्षेत्राच्या एवढ्या जवळ असून सुद्धा या भागाचा रखडलेला विकासाला देखील वेग मिळणार आहे.
अटल सेतू बांधण्यासाठी 18 हजार कोटी रुपयांचा खर्च :
अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतू ” हा एकूण 22.8 km लांबीचा सागरी सेतू असून सध्याच्या घडीला हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू आहे, जो की दक्षिण मुंबईला समुद्रमार्गे नवी मुंबईला जोडण्यात सक्षम आहे. हा पूल बांधण्यासाठी 18 हजार कोटी रुपये खर्च आला.