हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Vande Bharat Depot । भारतीय रेल्वे कडून मुंबईकरांना मेट्रो डेपोची भेट देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेने कनेक्टिव्हिटीचा आणि भविष्यातील विस्ताराचा विचार करुन हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, या नव्या मेट्रो डेपो साठी जोगेश्वरी-राम मंदिर स्थानकांदरम्यानचा सहा एकरचा परिसर निवडला आहे. याठिकाणी बुलेट ट्रेनची देखभाल, स्थिरीकरण केलं जाईल. लवकरच या मेट्रो डेपो स्टेशन साठी बांधकाम सुरु होईल. यामुळे मुंबईकरांचा प्रवासाला आणखी चालना मिळेल.
सुरुवातील ५ ते ६ रेल्वेची सर्व्हिस करण्यात येईल – Mumbai Vande Bharat Depot
पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागून असलेले आणि लवकरच कार्यरत होणाऱ्या जोगेश्वरी टर्मिनसशी थेट जोडलेले या मेट्रो डेपो मुळे कनेक्टिव्हिटी, लॉजिस्टिक्स आणि भविष्यातील स्केलेबिलिटीमध्ये धोरणात्मक फायदे होतील यात शंकाच नाही. यामुळे पारंपारिक प्रीमियम गाड्या टप्प्याटप्प्याने सोडून इलेक्ट्रिक, वेगवान आणि अधिक कार्यक्षम वंदे भारत मॉडेल्सच्या बाजूने भारतीय रेल्वेच्या व्यापक धोरणात हे एक महत्त्वाचे स्थान आहे. पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरुवातील ५ ते ६ रेल्वेची सर्व्हिस करण्यात येईल असा डेपो उभारला जाईल. तसेच भविष्यात ही क्षमता टप्प्याटप्प्यात वाढवली जाणार आहे. एका वेळेस 50 गाड्यांची देखभाल करण्याची क्षमता या डेपोची (Mumbai Vande Bharat Depot) असणार आहे.
७७ कोटी रुपयांचा आगामी जोगेश्वरी टर्मिनस हा ग्रीनफील्ड प्रकल्प दादर, वांद्रे आणि मुंबई सेंट्रल वरील गर्दी कमी करेल. या टर्मिनसमध्ये तीन प्लॅटफॉर्म असतील. प्रत्येकी 600 मीटर लांबीचे हे फ्लॅटफॉर्म्स 24 डब्यांच्या गाड्या हाताळण्यास सक्षम असणार आहेत. डेपोच्या उभारणीमुळे जोगेश्वरीहून वंदे भारत गाड्या सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच येत्या ऑगस्टपर्यंत मुंबई-अहमदाबाद मार्गावर रेल्वेगाड्या 160 किमी प्रतितास वेगाने धावण्याची शक्यता आहे.




