मुंबई : हॅलो महाराष्ट्र – रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी रेल्वे पुलाचा वापर करा अशी सूचना रेल्वे प्रशासनाकडून आपल्याला वारंवार करण्यात येते. तरीसुद्धा अनेक लोक या सूचनेकडे दुर्लक्ष करत स्वत:चा जीव धोक्यात घालून रेल्वे ब्रिजचा वापर न करता रेल्वे रुळांवरुनच एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात. यामध्ये अनेक लोकांना आपले प्राणदेखील गमवावे लागतात. पण आज कल्याण स्थानकात अशीच एक थरारक घटना घडली आहे.
#WATCH | A senior citizen narrowly escaped death after a locomotive train in Mumbai's Kalyan area applied emergency brakes to save the man as he was crossing the tracks. pic.twitter.com/RwXksT3TCM
— ANI (@ANI) July 18, 2021
मुंबई-वाराणसी रेल्वे कल्याण रेल्वे स्थानकात पोहोचत असताना एक वृद्ध व्यक्ती रेल्वे रुळ ओलांडत असल्याचे मोटरमनच्या लक्षात आले. त्यानंतर मोटरमनने वेळीच समयसूचकता दाखवत आपत्कालीन ब्रेक दाबला आणि वृद्ध व्यक्ती रेल्वेच्या चाका खाली येण्यापासून बचावला. अवघ्या काही सेकंदाच्या फरकानं वृद्धाचा जीव वाचला. रेल्वे वृद्ध व्यक्तीच्या अतिशय जवळ येऊन थांबली होती. हि वृद्ध व्यक्ती इंजिनाच्या पहिला चाकाजवळ अडकली होती. रेल्वेचे लोको पायलट व सहाय्यक पायलट तातडीनं खाली उतरले आणि गत्यांनी या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढलं.
वृद्धाचं दैव बलवत्तर म्हणून रेल्वे ऐनवेळी थांबली आणि त्याचे प्राण वाचले. लोको पायलट आणि त्यांच्या सहकाऱ्यानी दाखवलेल्या समयसूचकतेचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. यासोबतच स्वत:चा जीव धोक्यात घालून अशा पद्धतीनं रेल्वे रुळ ओलांडू नका असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.