हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Aditya Narayan) बॉलीवूड संगीत विश्वातील अत्यंत लोकप्रिय गायक उदित नारायण यांनी ९०’चा काळ गाजवला आहे. आजही त्यांच्या गाण्यांचे अनेक चाहते आहेत. अशी एव्हरग्रीन गाणी देणाऱ्या गायकाचा मुलगा आदित्य नारायण देखील प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे. आदित्यचा बराच मोठा तरुण चाहता वर्ग आहे. आदित्यवर कायम प्रेमाचा वर्षाव करणारा त्याचा हा चाहता वर्ग सध्या त्याच्या एका कृतीमुळे प्रचंड नाराज आहे.
एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान आदित्य नारायणने चाहत्याला मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. इतकेच नव्हे तर बिग बॉस १७ हा विजेता मुनव्वर फारुकीने सुद्धा आदित्यच्या वागण्यावर टीका केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ छत्तीसगढमधील भिलाई येथील एका कॉलेजमधील आहे. इथे आदित्य नारायणच्या लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, आदित्य आपल्या चाहत्यांसमोर ‘डॉन’ या सिनेमातील ‘आज की रात’ हे गाणं गात आहे. (Aditya Narayan) दरम्यान, अचानक तो प्रेक्षकांमधील एका चाहत्याकडे पाहतो. चाहत्यांच्या हातावर माईक मारून त्याचा फोन हिसकावून घेतो आणि दूरवर फेकून देतो. आदित्यचं हे वागणं त्याच्या चाहत्यांना पटलं नसून यामुळे सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग सुरू आहे.
मुनव्वर फारुकीची टीका
बिग बॉस हिंदी सीजन १७ चा विजेता मुनव्वर फारुकी याने सोशल मीडिया ट्विटर x हँडलवर एक ट्विट शेअर केलं आहे. ज्यामध्ये त्याने उदित नारायण यांच्या ‘पापा केहते है..’ या गाण्याचा संदर्भ घेत टीका केली आहे. ताणें लिहिलंय कि ‘पापा कहते हैं, बदनाम करेगा! बेटा हमारा ऐसे कांड करेगा…’. यासोबत त्याने आदित्य नारायण असा हॅशटॅग देखील वापरला आहे.
नेटकऱ्यांकडून ट्रोलिंग सुरुचं (Aditya Narayan)
आदित्य नारायणचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरील वेगवेगळ्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत आदित्य नारायणवर टीका केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलंय, ‘कोण आहे हा जोकर.. इतका कसला माज आहे याला?’. तर आणखी एकाने म्हटले, ‘घ्या… असल्या फाल्तू गायकांचे पण कॉन्सर्ट होतात का?’, अन्य एकाने लिहिलं, ‘अरे हा काय प्रकार आहे? तो किती वैतागलेला दिसतोय. कशाला करायचा कॉन्सर्ट?’ आणखी एकाने लिहिलं, ‘तुझी लायकी तरी आहे का गाणं गाण्याची… याची हिंमत कशी होते फॅन्सवर हात उचलायची?’ सोशल मीडियावर इतकं ट्रोलिंग सुरु असताना अद्याप याबाबत आदित्यने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र इव्हेंट मॅनेजरची प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हणाला इव्हेंट मॅनेजर?
या प्रकाराबाबत बोलताना इव्हेंट मॅनेजर म्हणाला की, ‘तो मुलगा कॉलेजचा विद्यार्थी नसून बाहेरचा कोणीतरी असावा. तो सतत आदित्यचे पाय ओढत होता. मोबाईल मारून त्याला त्रास देत होता. जर आदित्य पडला असता तर? म्हणून आदित्यला त्याचा राग आला. अशा गोष्टी कायम घडतात. पण त्यामागील सत्य लोकांना कळत नाही. आपण फक्त एक बाजू पाहतो. तो मुलगा बरोबर असता तर त्याने या प्रकाराबाबत कॉलेज प्रशासनाला सांगितले असते. (Aditya Narayan) या प्रकारानंतर आदित्यचा हा कॉन्सर्ट २ तास चालू होता. त्याने विद्यार्थ्यांबरोबर जवळपास २०० सेल्फी घेतले असतील. मी अनेक वर्षांपासून या कॉलेजशी जोडलेलो आहे आणि आदित्य नारायणच्या कार्यक्रमाइतका चांगला कार्यक्रम यापूर्वी कधीच झाला नव्हता’.