महापालिकेकडून कोरोना उपाययोजनासाठी 19 कोटींचा प्रस्ताव

corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कोरोनाचा संपूर्ण राज्यभर प्रादुर्भाव दिसत आहे. कोरोना महामारीला हरवण्यासाठी शासनाने निर्बंध लावले आहे. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस तिसरी लाट येणार असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. आता ही तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी केली जात आहे. तिसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिकेने 800 कंत्राटी कर्मचारी- डॉक्टरांना ऑगस्ट महिन्यापर्यंत नियुक्त करण्यात आले आहे. या डॉक्टरांच्या वेतनावर महिन्याला सुमारे 2 कोटी रुपयांचा खर्च होत आहे.

महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 70 कोटी 73 लाख रुपयांचा प्रस्ताव दिला होता. यातून बाल कोविड केअर सेंटर उभारणे, साहित्य खरेदी, जुनी बिले देण्यासाठी हा प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु जिल्हाधिकारी यांच्याकडून सव्वा कोटी रुपये मिळाले होते. आता अजून 19 कोटी रुपयांचा निधी लवकर मिळावा यासाठी महापालिकेने प्रस्ताव पाठवला आहे.

कोरोना महामारी सुरू झाल्यापासून महापालिकेला आतापर्यंत आपत्ती व्यवस्थापनाकडून 37 कोटी 36 लाख आणि जिल्हा नियोजन समितीकडून दहा कोटी बारा लाख असा 47 कोटी 48 लाख रुपये निधी मिळाला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या आठशे कर्मचारी यांचे वेतन अजूनही थकीत असून हे कर्मचारी आता त्रासले आहे. म्हणून वेतनासाठी आठ कोटी रुपयांचा निधी आणि कोरोना रुग्णांना दिलेल्या भोजनापोटी अडीच कोटी रुपये थकीत आहेत या रकमेचा देखील प्रस्ताव तातडीने मंजूर करावा अशी मागणी केल्याची माहिती मिळत आहे.